Hello News 2026 Ganpati Arati Book
कोल्हापूरखेळताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यशैक्षणिकसांगलीसातारा

खो-खो स्पर्धेत कराड, मायणी आणि दहिवडी काॅलेज विजयी

कराड | सातारा विभागीय पुरुष खो-खो स्पर्धा कराड येथील सगाम महाविद्यालयात उत्साहात संपन्न झाली. सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयामध्ये शिवाजी विद्यापीठ अंतर्गत सातारा विभागीय पुरुष खो-खो स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेकरिता सातारा जिल्ह्यातील एकूण 13 महाविद्यालयानी सहभाग नोंदवला.

या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस. ए. पाटील, उपप्राचार्य प्रा. नेताजी सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांच्या व सातारा विभागीय क्रीडा परिषदेच्या सचिव प्रा. श्रीमती वैशाली खाडे यांच्या शुभहस्ते विजयी संघांना पारितोषिके देण्यात आली. महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. अरुणकुमार सकटे, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. रमेश पोळ हे उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
प्रथम क्रमांक- सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय कराङ
द्वीतीय क्रमांक- आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेज, मायणी
तृतीय क्रमांक- दहिवडी कॉलेज, दहिवडी
चतुर्थ क्रमांक- सरदार बाबासाहेब माने महाविद्यालय, रहिमतपूर
या चारही संघांची निवड दिनांक 19 व 20 ऑक्टोबर 2023 रोजी क्रांतिसिंह नाना पाटील कॉलेज, वाळवा येथे होणाऱ्या शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय पुरुष खो-खो स्पर्धेकरिता झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिमखाना विभाग प्रमुख प्रा. विद्या पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन चव्हाण यांनी केले तर आभार प्रा. डॉ. अभिजीत मुळीक यांनी मानले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close