बैलगाडा शर्यत : बकासूर, महिब्या बैलजोडीने मळाईदेवी- भैरवनाथ मानाची गदा व लाखाचे बक्षीस पटकावले
कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातून बैलगाड्यांचा सहभाग

कराड । कराड तालुकयातील श्री मळाई देवी भैरवनाथ यात्रा जखिनवाडी (ता. कराड) येथे नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यात्रेत आयोजित बैलगाड्यांच्या शर्यती यात्रेकरूंचे खास आकर्षण ठरले. या शर्यतीत रेठरे बुद्रुकचे सदाभाऊ कदम यांच्या बकासूर व महिब्या या बैलजोडीने आपली कमाल दाखवत प्रथम क्रमांकाची श्री मळाईदेवी- भैरवनाथ मानाची गदा व एक लाख रुपयाचे बक्षीस पटकावले.
या शर्यतीत कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातून बैलगाडी शर्यत शौकिनांनी सहभाग दर्शवलेला होता. प्रतिवर्षीप्रमाणे जखिनवाडी येथे श्री मळाई भैरवनाथ यात्रा मोठ्या प्रमाणात अनेक उपक्रमांपैकी बैलगाडी शर्यत शौकिनांचा आवडीचा विषय त्यात यात्रा कमिटीने बक्षिसांची केलेली खैरातीमुळे आणखीनच भर पडली. या स्पर्धेत रेठरे बुद्रुकचे बकासूर व महिब्या या बैल जोडीने प्रथम क्रमांक, ओगलेवाडी येथील संग्राम पाटील यांचे बैल जोडीने 71 हजाराचे बक्षीस मिळवून द्वितीय क्रमांक पटकावले. जखिनवाडी येथील अधिकराव पवार यांचे बैल जोडीने 51 हजाराचे बक्षीस मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
रेठरे बुद्रुकचे पैलवान मदन यांचे बैल जोडीने चौथ्या क्रमांकाचे 31 हजार रुपयांचे बक्षीस मिळविले. चचेगावचे ओम साईराम यांच्या बैल जोडीने पाचव्या क्रमांकाचे 21 हजाराचे बक्षीस मिळविले.
बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी शेतीमित्र अशोकराव थोरात, मलकापूर नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते अजित थोरात, पी.जी.पाटील, बापू पाटील, सरपंच मारुती पाटील,अधिकराव पवार तसेच यात्रा कमिटी सदस्य, ग्रामस्थ, बैलगाडी शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.