पाटणला गोळीबारात 2 जण जागीच ठार : माजी नगरसेवक ताब्यात

पाटण | पाटण तालुक्यातील शिद्रुकवाडी येथे रात्री उशिरा गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये 2 जण जागीच ठार झाले असून 1 जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे पाटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. गोळीबार करणारा हल्लेखोरास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदार संघात ही घटना घडली असून हल्लेखोर मदन कदम यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मदन कदम हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आहे. गोळीबार केल्याची माहिती समजताच पाटण पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करित आहेत.
शिवसेनेचे माजी संपर्कप्रमुख व ठाणे महापालिकेचा माजी नगरसेवक अशी मदन कदम याची अोळख आहे. पाटण तालुक्यातील मोरणा विभागात झालेल्या गोळीबारामुळे तालुक्यातील तणावाचे वातावरण आहे. घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.