अंबेवाडी येथे मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन
कराड | मौजे अंबेवाडी (ता. सातारा) येथे कराड उत्तरचे भाजपा नेते मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले. यावेळी सरपंच अनिल शितोळे, उपसरपंच शंकर जाधव, अशोकराव घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गावातील अंतर्गत कॉक्रीट रस्ता व साठवण बंधारा याचे लोकर्पण करण्यात आले.
यावेळी मनोजदादा घोरपडे म्हणाले, आजपर्यंत माझ्या राजकीय व वैयक्तिक जीवनात आंबेवाडी गावचे योगदान मोठे असुन मला हे माझे स्वःताचे गाव असल्यासारखे आहे. आजपर्यत जसा गावचा सर्वांगीण विकास केला, तसा इथुन पुढे गावच्या विकासासाठी कायम सहकार्य राहील. गावातील सर्वानी मतभेद विसरून गावच्या विकासा साठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी सौ. वैशाली शितोळे, उद्धव मोहीते, सौ. सुनिता बोडके, बाळासो शितोळे, संजय शितोळे, हणमंत शितोळे, केशव शितोळे, सुनिल शितोळे, शिवाजी शितोळे, अधिक शितोळे, प्रकाश शितोळे, सुधाकर शितोळे, कालीदास ढाणे, विकास बर्गे, दत्ता शितोळे, संदीप बर्गे, युवराज शितोळे, मदन शितोळे, बबन पवार, तात्यासो शितोळे, दिपक शितोळे, दिलीप खरात, लक्ष्मण शितोळे, विजय तुपे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक नितीन शितोळे यांनी केले. सुत्रसंचालन प्रदिप शितोळे यांनी केले. आभार तुषार शितोळे यांनी मानले.