ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसातारा

कराड उत्तरचे लोकप्रतिनिधी निष्क्रीय : मनोजदादा घोरपडे

कोरेगाव | आजही कराड उत्तर विधानसभा मतदार संघात रस्ते, पाणी यासाठी जनता झटत आहे. आता मतदाराच्या तोंडी एकच वाक्य असते ते म्हणजे “कराड उत्तर मध्ये आता बदल हवा” राज्यात आघाडी सरकार असताना कोणतीही कामे झाली नाहीत. कराड उत्तरचे आमदार हे राज्यात मंत्री व जिल्ह्यात पालकमंत्री होते. गेली 25 वर्ष कराड उत्तरचे नेतृत्व करतायत त्यांना आजुन पाणी, रस्ता, वीज या मूलभूत गरजा लोकांना देता आल्या नाहीत. आमदारांच्या निष्क्रियतेमुळे आता गावोगावी लोक म्हणतायत कराड उत्तरमध्ये बदल केला पाहिजे. येत्या 2024 ला महायुतीच्या माध्यमातून कराड उत्तरमध्ये परिवर्तन अटळ असल्याचे प्रतिपादन कराड उत्तरचे भाजपा नेते मनोजदादा घोरपडे म्हणाले.

मौजे पिंपरी (ता. कोरेगाव) येथे सुरेश भोसले यांच्या माध्यमातून दीड कोटी रुपयांचे विविध विकास कामांचे भुमिपूजन भाजपा नेते मनोज दादा घोरपडे यांच्या हस्ते व शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंत शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी दादामहाराज गोरेगावंकर, विक्रमशील कदम, भिमराव काका पाटील, वासुदेव माने, पै. जालिंदर गोडस, शैलजा पवार, सरपंच सुनिल राजेभोसले, तात्यासाहेब साबळे, ॲड. अशोकराव पवार, विष्णूपंत कणसे, शिवाजीराव निकम, आप्पासो पवार, युवराज घाडगे, नानासो पवार, बळवंत कणसे, नारायण पवार, राजेंद्र भोसले, लालासो भोसले, ऋषीकेश तुपे, नवनाथ पवार, निलेश तुपे, अविनाश जाधव, भिमराव भोसले, शिवाजीराव पवार, धनाजी घाडगे, प्रविण कदम, राजेंद्र गोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थित होते.

यावेळी जयवंत शेलार म्हणाले, राज्यात शिवसेना- भाजपा युती सरकार सत्तेत आले आणि विकासाचे चक्र गतिमान झाले. सुरेश बापू सारख्या सामान्य कार्यकर्ता सुधा मुख्य प्रवाहात आला असून राज्याचे मुखमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात वेगवान निर्णय होत आहेत. सध्या वैयक्तिक योजनांची शासकीय जत्रा आपल्या जिल्ह्यात चालू होत असून प्रत्येक नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा. कार्यक्रमाच्या प्रारंभी ढोल ताशांच्या गजरात प्रमुख पाहुण्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. सूत्रसंचलन तात्या सबले यांनी केले. आभार सुरेश भोसले यांनी मानले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker