Hello News 2026 Ganpati Arati Book
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

पवारवाडीतील मायलेकीची फसवणूक, अत्याचार व आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा

सातारा | पवारवाडी येथील एका विहिरीत मायलेकीचा मृतदेह आढळून आल्याने घातपात की आत्महत्या याबाबत तर्कवितर्क काढले जात होते. या मायलेकीच्या आत्महत्येचे कारण समोर आले असून तिघांवर फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मायलेकीच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी सुखदेव मिंड, राधा सुखदेव मिंड व गणेश सुखदेव मिंड (सर्व रा. पवारवाडी, ता. फलटण) यांच्यावर फसवणूक, अत्याचार व आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, पवारवाडी (ता. फलटण) येथील सुखदेव मिंड, त्याची पत्नी राधा सुखदेव मिंड यांनी फिर्यादी यांची भाची ही अल्पवयीन आहे, हे माहीत असताना संशयित आरोपींनी मुलगा गणेश सुखदेव मिंड यास तिला लग्नाचे आमिष दाखवून प्रेम संबंध निर्माण करण्यास लावले. त्यातून गणेश सुखदेव मिंड याने दि. 21 सप्टेंबर 2023 हीस फूस लावून फलटणला नेऊन तिच्यावर तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर फिर्यादी यांच्या भाचीसोबत लग्न करण्यास नकार दिला.

सदरची बाब पीडित अल्पवयीन मुलीने तिच्या आईस सांगितल्यानंतर त्या दोघींनी काल दि. 22 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 9.00 वाजता पवारवाडी गावच्या हद्दीत असलेल्या शेतातील विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक रानगट करत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close