क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा
Satara News : शेततळ्यात बुडून 2 मुली व एका महिलेचा मृत्यू

कराड प्रतिनिधी |सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील पाडळी- हेळगांव येथे शेततळ्यात 2 मुली व एका महिलेचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शेततळ्यात पोहायला गेलेल्या महिला व मुलींसोबत ही दुर्घटना घडली. मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पाडळी येथे आज सकाळी 10 वाजता काही महिला व मुली पोहण्यासाठी शेततळ्यावर गेल्या होत्या. यावेळी पाण्यात बुडू लागलेल्या काही महिलांना वाचविण्यात यश आले. मात्र, रागिणी रामचंद्र खडतरे (वय- 4), वैष्णवी गणेश खडतरे (वय- 15), शोभा नितीन घोडके (वय- 32) या तिघींचा बुडून मृत्यू झाला.
पाडळी येथील माणिक पाटील यांच्या मालकीच्या शेततळ्यात ही दुर्घटना घडली . या घटनेने संपूर्ण पाडळी परिसर हादरून गेला. या घटनेची नोंद मसूर पोलीस ठाण्यात झाली आहे. मृत्यू झालेल्या तिघींचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत.