RTO ची विशेष मोहिम : वाहन चालकांना 42 लाख 8 हजारांचा दंड
सातारा । उप प्रादेशिक परिवहन विभागाकडून रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने विशेष तपासणी मोहिमेद्वारे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 3 हजार 475 दोषी वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये 42 लाख 07 हजार 93 इतका प्रत्यक्ष दंड व कर वसुल करण्यात आला असल्याची माहिती सातारा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली.
गतवर्षाच्या तुलनेत सातारा जिल्हयामध्ये अपघात व अपघाती मृत्यु यामध्ये वाढ झाली आहे. अपघात व अपघाती मृत्यू कमी करण्याच्या दृष्टीने या कार्यालयामार्फत 1 मे 2023 ते 17 मे 2023 या कालावधीमध्ये रस्ता सुरक्षेच्या दृष्टिने राष्ट्रीय महामार्ग व इतर महामार्गावर उप प्रादेशिक परिवहन विभागाकडून विशेष पथकामार्फत तपासणी मोहिम राबिवण्यात आली. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या विविध कारवाईमध्ये हेल्मेट- 1342, वाहन चालविताना मोबाईलचा वापर- 71, अति वेगाने चालणारी वाहने- 931, सिटबेल्ट- 58, चुकीच्या लेनमधुन चालणारी वाहने- 59, धोकादायक पार्किंग- 100, ट्रिपल सिट- 38, विमा नसलेली वाहने- 205, पी. यु. सी नसलेली वाहने- 116, योग्यता प्रमाणपत्र नुतणीकरण नसलेली वाहने- 85, रिफ्लेक्टर/ टेल लॅम्प- 59 अशा प्रकरणांचा समावेश आहे.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत मे 2023 मध्ये खाजगी प्रवासी बसेसची विशेष तपासणी मोहिम राबविण्यात आली असून या मोहिमेत 1254 वाहन तपासली आली. यात 418 वाहने दोषी आढळल्याने एकूण 7 लाख 73 हजार 606 इतका दंड वसूल करण्यात आला आहे. विशेष तपसणी मोहिम या कार्यालयामार्फत रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने यापुढेही नियमितपणे राबविली जाणार असुन दुचाकी, चारचाकी व पादचाऱ्यांना खालील वाहतुकीच्या नियमांचे रस्ता सुरक्षेच्या दृष्टिने पालन करावे असे, आवाहन सातारा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, विनोद चव्हाण यांनी केले आहे.