प्रशासनाची दिरंगाई अन् राजकीय श्रेयवादात… अखेर ग्रामस्थांनीच फोडला नारळ
मसूर प्रतिनिधी| गजानन गिरी
मसूरच्या रेल्वेच्या उड्डाणपुलाचे काम बऱ्याच दिवसापूर्वी पूर्ण झाले आहे. उद्घाटना अभावी पूलावरचा मार्ग बंदच ठेवला होता. परिणामी रेल्वे प्रशासनाच्या दिरंगाईमुळे, राजकीय श्रेयवादामुळे उद्घाटनाचा नारळ फुटला जात नव्हता. लोकांना रेल्वे गेटवरच्या वाहतुकीच्या कोंडीचा फार मोठा त्रास सहन करावा लागत होता. अखेर सहनशीलता संपल्याने. या पूलाचा निर्णय नारळ फोडून लोकांनीच लावला.या परिसरातील ग्रामस्थांनीच एकत्रित येत उड्डाणपुलाचे उद्घाटन केले. त्यामुळे आता वाहतुकीचा मार्ग खुला झाला.
माजी सहकार व पणन मंत्री आमदार बाळासाहेब पाटील व सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या सतत पाठपुराव्याने नव्याने बांधलेल्या रेल्वेच्या उड्डाणपुलाचे मसूर व परिसरातील नागरिक, विविध गावच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. या उड्डाणपुलाचे बऱ्याच दिवसापासून काम पूर्ण झाले होते. हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नव्हता. त्यामुळे रेल्वे फाटकावर वाहतुकीची कोंडी होत होती. तसेच दुर्घटनांमध्ये वाढ झाली होती, त्यामुळे लोकांना फार त्रास सहन करावा लागत होता. मसूरच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी कांबिरवाडी, कवठे, कोणेगाव, खराडे, वाण्याचीवाडी, हणबरवाडीचे सरपंच, उपसरपंच या सर्वांनी मिळून उड्डाणपूलाचे उद्घाटन करून वाहतुकीसाठी खुला केला.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व सातारा जिल्हा परिषदेचे माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक लहूराज जाधव, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक लालासाहेब पाटील, माजी पंचायत समिती सदस्य सुनील पाटील, कोणेगावचे सरपंच रमेश चव्हाण, कांबिरवाडीचे सरपंच महेंद्र बोले, खराडेचे शरद बर्गे, मसूरचे उपसरपंच विजयसिंह जगदाळे, प्रा. कादर पिरजादे, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन शहाजीराजे जगदाळे, माजी सरपंच प्रकाश माळी, दिनकर शिरतोडे, .ग्रा.प. सदस्य रमेश जाधव, प्रमोद चव्हाण, महेश घाटगे, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष सिकंदर शेख, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत पाटील, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष जमीर मुल्ला, बापूसाहेब जगदाळे, अरुण कांबिरे, शिवाजी माने, सचिन चव्हाण, समाधान चव्हाण, अशोक कांबिरे, राजू पवार, निवास चव्हाण, हिमांशू शहा, जितेंद्र निकम, रवी जाधव, सागर लंगडे, वसंत पाटोळे, प्रताप जगदाळे, व्यंकटराव शेडगे आधी उपस्थित होते.