ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराजकियराज्यसातारा

ग्रामपंचायत पोटनिवडणूक निकाल : गमेवाडी, वाण्याचीवाडी व शेळकेवाडी- म्हासोलीत गुलाल ‘या’ उमेदवारांना

कराड | कराड तालुक्यातील गमेवाडी, वाण्याचीवाडी आणि शेळकेवाडी- म्हासोली येथे ग्रामपंचयातीच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक झाली होती. या निवडणुकीचा निकाल आज लागला. यामध्ये गमेवाडीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पॅनेलचे दिपक संपत तावरे यांनी विजय मिळवला. वाण्याचीवाडी येथे आमदार बाळासाहेब पाटील समर्थक शरद चव्हाण यांनी लोकनियुक्त सरपंचपदी तर सदस्यपदी सतीश पवार यांनी विजय मिळवला. शेळकेवाडी- म्हासोलीत रमेश यशवंत मोहिते यांनी विजय मिळवला.

Gram panchayat elections Karad

शेळकेवाडी- म्हासोली ग्रामपंचायत निवडणूकीत रमेश यशवंत मोहिते यांनी 73 मते मिळवत विजय मिळवला तर विरोधी उमेदवार भगवान बंडू मोरे यांना 56 मते मिळाल्याने त्याचा पराभव झाला. या पोटनिवडणुक निकालनंतर विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करित जल्लोष केला.

गमेवाडीत दिपक तावरे विजयी
गमेवाडी येथे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पाटणकर गटाच्या नवनाथ पांडुरंग जाधव या उमेदवाराचा पराभव झाला. विजयी उमेदवार दिपक तावरे यांना 161 मते मिळाली तर पराभूत उमेदवार नवनाथ जाधव यांना 143 मते मिळाली. विजयी उमेदवाराचे संतोष जाधव, भास्कर यादव, विकास कालेकर, दाजी पवार, वसंत जाधव, सुरेश जाधव, नितीन जाधव, जगन्नाथ जाधव, प्रकाश जाधव, आनंदा धडाम, रूपेश जाधव, जगदीश जाधव, विठ्ठल जाधव, करण जाधव, जयवंत जाधव, किरण चोपदार, किरण ढगाले यांनी अभिनंदन केले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close