सातारा लोकसभा मतदारसंघात राजे विरुद्ध राजे लढत? : रामराजे म्हणतात, इच्छेचा योग्य मान राखला जाईल
सातारा | सातारा विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त फलटण येथील आयोजित कार्यक्रमात रामराजेंना दिल्लीत पाठवण्याबाबत वक्तव्य जयंत पाटलांनी केले होते. या वक्तव्यानं आता साता-यात भाकरी फिरवली जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. कारण रामराजे नाईक- निंबाळकर यांनी निवडणुकीबाबत माध्यमांशी बोलतना संकेत दिले आहेत.
सातारा लोकसभा लढणार का या पत्रकारांच्या प्रश्नावर रामराजे नाईक- निंबाळकर म्हणाले, लोकसभे बाबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील हे बोलले आहेत. तेव्हा त्यांना याबाबत विचारा, मला काय विचारता. तुम्ही माढ्यातून इच्छुक आहात. परंतु तुम्ही माढा की सातारा या प्रश्नावर रामराजेंनी दिलेल्या उत्तरामुळे आता नवा ट्विस्ट राजकारणात निर्माण होणार आहे.
कार्यकर्ते व पत्रकार यांची इच्छा ही रामराजे यांनी सातारा लोकसभा निवडणूक लढवावी अशी आहे. यावर रामराजेंनी एका अोळीत उत्तर दिले ते म्हणाले, तुमच्या इच्छेचा योग्य मान राखला जाईल असे सांगत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सातारा लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्त केली.यामुळं आता येणा-या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उदयनराजेंच्या विरोधात रामराजे मैदानात दिसणारं अशी शक्यता आतापासूनच वाटू लागली आहे.