जरा काय झालं की, कॅमेऱ्यासमोर हिच भू..भु…भू…: अजित पवारांचे शिंदे गटातील मंत्र्यावर टीकास्त्र
कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी
कराड- चिपळूण रस्त्याचे किती वर्ष झालं काम चालू आहे. सगळ्या रस्त्याचं वाटोळं केलं आहे. काय करतोय इथला आमदार असा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला. तसेच यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.
गुढे- तळमावले (ता. पाटण) येथे राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार बोलत होते. यावेळी माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर, बाळासाहेब सोळस्कर, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित पाटणकर, राजेश पाटील, राजाभाऊ शेलार, राजेश पाटील – वाठारकर, शफिक शेख यांच्यासह राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सरपंच, सदस्य, सोसायटीचे चेअरमन, सचालक व पाटण तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, सारखं जरा काही झालं की टीव्हीच्या पुढे, सगळा मक्ता यालाच दिलाय, शिंदेंवर साहेबांच्यावर बोललं तरी हिच भू..भु…भू…, कुणावरही काही झालं की ह्यांनीच बोलायचं. माणसाने सत्ता आली की सत्तेची नशा चढू द्यायची नसते.