क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

उंब्रजजवळ 2 अपघात : महामार्गावर इको गाडी आणि मालट्रक पलटी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी 
पुणे- बंगलोर आशियाई मार्गावर उंब्रजजवळ कोर्टीजवळ आज दुपारी अपघात झाला आहे. चालकाचा ताबा सुटल्याने इको गाडीचा अपघात झाला असून 5 जण जखमी किरकोळ झाल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे. अपघातात योगिता मोहन बोबडे, मिनाक्षी मोहन बोबडे, मनिषा हिंदुराव पवार, लालासो दादा पवार सर्व राहणार बोडकेवाडी (फलटण) अशी जखमी झालेल्या चौघांची नावे आहेत.

Sunil Bamane

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कोल्हापूरहून सातारच्या दिशेला निघालेल्या गाडीचा चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला. रविवारी दि. 7 रोजी दुपारी पावने तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जखमींना उपचारासाठी कराड येथील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. यावेळी गाडीतील जखमींनी मोठा आरडाअोरडा केला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना गाडीतून बाहेर काढण्यात आले असून उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झालेली होती.

उंब्रजजवळ मालट्रकही पलटी
साताराहून कोल्हापूरच्या दिशेला निघालेला मालट्रकचाही उंब्रजजवळ अपघात झाला. मालट्रक मुख्य महामार्गावर अपघात झाल्याने काही काळा वाहतूक खोळबंली होती.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker