खेळताज्या बातम्यादेशब्रेकिंगराज्य

IPL फायनल : गेमचेंजर रविंद्र जडेजामुळे धोनीच्या चेन्नईला विजेतेपद

अहमदाबाद । आयपीएलच्या शेवटच्या सामन्यात पावसाचा खेळ सुरू असताना. शेवटी डकवर्थ लुईस नियमानुसार आणि गेमचेंजर ठरलेल्या रविंद्र जडेजाच्या खेळीमुळे चेन्नईने रोमहर्षक सामन्यात पाचव्यांदा विजेतेपद मिळविले. आयपीएलच्या 16 व्या हंगामात महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा शेवटच्या चेंडूवर चाैकार मारत विजय मिळवला. या शानदार विजयासह चेन्नईने मुंबई इंडियन्सच्या सर्वाधिक 5 जेतेपद पटकावण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या अंतिम सामना झाला. टॉस जिंकत चेन्नईच्या संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या गुजरात टायटन्सने साई सुदर्शनच्या आणि वृद्धीमान सहाच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर २१४ धावा केल्या आणि चेन्नईसमोर २१५ धावांचे आव्हान ठेवले. यावेळी स्फोटक फलंदाज शुभमन गिलला रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर धोनीने यष्टिचित केले. दरम्यान, चेन्नईचा संघ फलंदाजीसाठी उतरल्यानंतर पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे ३ चेंडूमध्ये ४ धावा चेन्नईने काढल्या आणि सामना पावसामुळे थांबला होता. यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार चेन्नईला १५ षटकांमध्ये १७१ धावांचे आव्हान देण्यात आले. चेन्नईकडून डेवॉन कॉनवे २५ चेंडूमध्ये ४७, शिवम दुबे २१ चेंडूमध्ये ३२, ऋतुराज गायकवाड १६ चेंडूमध्ये २६, रवींद्र जडेजा ६ चेंडूमध्ये १५, अजिंक्य रहाणे ६ चेंडूमध्ये १५ आणि अंबाती रायडूने ८ चेंडूमध्ये १९ धावांचे योगदान दिले.

तत्पूर्वी, साई सुदर्शनच्या फटकेबाजीमुळे गुजरातला मोठी धावसंख्या उभारता आली आहे. सुरुवातीला शुभमन गिल आणि वृद्धीमान सहाने तर शेवटच्या षटकांमध्ये साई सुदर्शन आणि हार्दिक पंड्याने चेन्नईच्या फलंदाजांची चागंलीच धुलाई केली. गुजरात टायटन्सकडून शुभमन गिलने २० चेंडूमध्ये ७ चौकारांच्या सहाय्याने ३९ धावा, वृद्धीमान सहा ३९ चेंडूमध्ये ५ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने ५४ धावा, साई सुदर्शनने ६ षटकार आणि ८ चौकारांच्या सहाय्याने ४७ चेंडूमध्ये ९६ धावा आणि हार्दिक पंड्याने १२ चेंडूमध्ये २१ धावा केल्या. चेन्नईकडून दीपक चहर आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी १ विकेट पटकावली.

शेवटच्या षटक अन् रविंद्र जडेजा
गुजरातला १५ चेंडूत विजयासाठी २२ धावांची गरज असताना अंबाती रायडू आणि महेंद्रसिंग धोनी दोघेही सलग दोन चेंडूवर आऊट झाले. अखेर शेवटच्या षटकात ६ चेंडूवर १३ धावांची गरज असताना पहिल्या ४ चेंडूवर अवघ्या ३ धावा काढल्या तर शेवटी २ चेंडूवर १० धावांची गरज असताना ५ व्या चेंडूवर षटकार आणि शेवटच्या चेंडूवर चाैकार मारून रवींद्र जडेजाने चेन्नईला विजयी केले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker