गोव्याहून नाशिकला दारू : कराडला आंब्याच्या गाडीत 110 बाॅक्स गोव्याची दारू सापडली
कराड राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

कराड | पुणे- बेंगलोर महामार्गावर नांदलापूर फाटा (ता. कराड) येथे गोव्याहून नाशिकला जाणारी गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअप गाडी सह 18 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये दोघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती राज्य उत्पादन विभागाचे सब इन्स्पेक्टर विनोद शिंदे यांनी सांगितले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, पुणे – बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर संशयीत रित्या चारचाकी वाहन आढळून आल्याने त्या वाहनाची झडती घेण्यात आली. त्या वाहनात गोवा बनावटीच्या मद्याचे 750 मिलीच्या 1 हजा 320 बाटल्या म्हणजेच सुमारे 110 बॉक्स अढळून आले. त्याच बरोबर गाडी क्र (MH- 17- BY- 9437) महिंद्रा बोलेरो पिक अप, दोन मोबाईल असा जवळपास एकूण 18 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात अजय वसंत कुळधरण (वय- 28) व साहील रामदास धात्रक (वय- 20 वर्षे, दोन्ही रा. पिंपरी लौके, ता. राहाटा, जि. अहमदनगर) अटक करण्यात आली असून दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर व सातारा जिल्हा अधीक्षक किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरिक्षक व्ही. बी. शिंदे, पी. व्ही. नागरगोजे, सहा. दुय्यम निरीक्षक पी. आर. गायकवाड, जवान व्ही. व्ही. बनसोडे यांनी ही कारवाई केली. सदर गुन्ह्यातील तपास कराड राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक व्ही. बी. शिंदे करत आहे.