Hello News 2026 Ganpati Arati Book
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

कराड- शेडगेवाडी मार्गावर दुचाकीचा चक्काचूर : एक जागीच ठार

कराड। कराड- शेडगेवाडी मार्गावर येळगाव फाटा येथे गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक आणि मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. सुनिल श्रीमंत पाटील (वय- 42, रा. पांचगणी ता. शिराळा, जि. सांगली) असे या अपघातात ठार झालेल्याचे नांव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुनिल पाटील हे मोटारसायकलवरून कराड- चांदोली मार्गावर उंडाळे बाजूकडून सांगली जिल्ह्याच्या दिशेने जात असताना येळगांव फाट्यादरम्यान गवारकर वाडीच्या हद्दीत ते आले असता समोरून रत्नागिरीच्या दिशेने गॅस सिलेंडर भरून आलेल्या ट्रकची आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर होऊन सुनिल पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची नोंद कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली. घटनास्थळी पोलिस निरीक्षक विजय पाटील यांनी तातडीने धाव घेऊन पाहणी केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार सुनिल माने करीत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close