जवान सुरज यादव यांच्यावर अंत्यसंस्कार : 11 महिन्याच्या चिमुकल्याने दिला भडाग्नी

कराड | येरवळे (ता. कराड) येथील जवान सुरज मधुकर यादव यांचे पार्थिव दोन दिवसानी आज सकाळी मुळगावी आणण्यात आले. विंग हाॅटेल ते येरवळे गावात अंत्ययात्रा काढत ११ वाजण्याच्या सुमारास शासकीय इतिमामात सुरज यादव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हाजारोच्या संख्येनी उपस्थितानी जड अंतकरणानी अखेरचा निरोप त्यांना दिला. वीर जवान सुरज यादव अमर रहे, वंदे मातेरमच्या घोषणानी संपूर्ण परिसर गहिवरून गेला. जवान सुरज यादव यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, आ. शिवेंद्रराजे भोसले, खा. रणजिंतसिंह नाईक- निंबाळकर यांनी भेट घेत सांत्वन केले.
येरवळे येथील जवान सूरज यादव यांचे सोमवारी सांयकाळी दीमापूर (नागालँड) येथे सेवा बजावताना निधन झाले. तेव्हापासून कुटूंबीयासह गावकऱ्यांचे डोळे त्या वाटेवरून येणाऱ्या जवानाच्या पार्थिवकडे लागून राहिले होते. आज पहाटे विमानाने त्याचे पार्थीव पुण्यात पोहचले. तेथील शासकीय वहानाने सकाळी मुळगावी येरवळेत ते आणले. कुटूंबीयाचा अक्रोश ह्रदय पिळवटणारा होता. जवान सुरज यांचा 11 महिन्याच्या कृष्णांश या बाळाला पाहून अनेकांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या.
कोयना नदीच्या काठावर हाजारोंच्या उपस्थीतीत शासकीय इतमामात चुलते सुनिल यादव व 11 मुलगा महिन्याचा मुलगा कृष्णांश यांनी भडाग्नी दिला. तत्पुर्वी 24 मराठा लाईट इन्फट्रींच्या जवानांनी हवेत फैरी झाडून मानवंदना दिली. सातारा पोलीस विभागाने सलामी यावेळी दिली. कॅप्टन सुजितसिंह कुमार सहाय्यक कॅप्टन एस. इ. बाबर, तहसीलदार विजय पवार, गटविकास अधिकारी मीनाताई साळुंखे, एपीआय संदीप मोरे, मनोहर शिंदे, अशोकराव पाटील पोतलेकर, अॅड आनंदराव पाटील, माजी पंचायत समिती सदस्या नंदाताई यादव, सरपंच रूपाली यादव यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दाजंली वाहिली. सातारा फाऊंडेशनचे माजी सैनिक अणि गावच्या तरूणांना विशेष परिश्रम यावेळी घेतले.
कराड दौऱ्यावर आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येरवळे येथील शहीद जवान सुरज यादव यांच्या घरी दुपारी जावून भेट दिली. कुटूंबीयाचे सात्वंन केले. आम्ही व संपूर्ण देशवासीय तुमच्या दुःखात सहभागी आहोत. असे उदगार यावेळी त्यांनी काढले. खासदार रणजितसिंह नाईक निबांळकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार प्रविण दरेकर, विक्रम पावसकर यांनी सांत्वन भेट दिली.