ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराजकियराज्यसातारा

विधानसभा अध्यक्षांचा निर्णय अयोग्य वाटल्यास सुप्रीम कोर्टात जाण्याचा मार्ग : पृथ्वीराज चव्हाण

कराड | विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर घटनेला धरून अपेक्षित निर्णय घेतील का याबाबत ठाकरे गटाला शंका आहे. यावर काॅंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, विधानसभा अध्यक्ष घटनात्मक पदावर बसलेले आहेत, घटनेच्या चाैकटीत त्यांना काम करावे लागणार आहे. कुणाला वाटलं निर्णय अयोग्य आहे, तर सुप्रीम कोर्टाचा जाण्याचा मार्ग मोकळा आहे.

मलकापूर येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माध्यमांशी संवाद साधला. पुढे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, एकनाथ शिंदे गटाच्या विरोधात पक्षांतर बंदी जी कारवाई चालू आहे. त्यामुळे त्यांना नोटीस देतील, साक्षीकरता बोलवायची कारवाई करतील. माझ्या माहितीप्रमाणे हा वाद 11 मे रोजी सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षाकडे सुपूर्द केला आहे. त्यानंतर 90 दिवसात हा निर्णय द्यायचा होता. आता 10 आॅगस्टच्या आत हा जो काही असेल तो निर्वाळा द्याला लागेल.

विरोधी पक्षनेते पदाच्या चर्चेची गरज नाही 
विरोधी पक्षनेते पदाची चर्चेची गरज नाही. सत्तेत ज्या पक्षाचा नेता असेल तो पंतप्रधान बनतो. विरोधात गठबंधन असेल तर जो पक्ष मोठा असेल त्याचा विरोधी पक्षनेता बनत असतो. सध्या विरोधातील कोणता गट मोठा आहे, यांची स्पष्टता नाही. ज्या दिवशी स्पष्टता येईल, त्यादिवशी निर्णय होईल. त्यावर चर्चा करायची गरज नाही, असेही आ. पृथ्वीराज चव्हाण विरोधी पक्ष नेते पदाच्या चर्चेत बाबत म्हणाले.

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close