पुणे- बेंगलोर महामार्गावरील प्रसिध्द माॅलमध्ये गोळीबार, सेल्समन जखमी

सातारा | शेंद्रे (ता. सातारा) येथे एका प्रसिध्द शु मॉलमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली. पिस्टल पडल्यानंतर ती ठेवत असताना बदुंकीतून फायर झाला. भरदिवसा पुणे- बंगलोर हायवेवर असलेल्या या माॅलमधील गोळीबारमुळे खळबळ उडाली. पिस्तुलाच्या कव्हर मध्ये बंदूक ठेवत असताना गोळी सुटून सेल्समन जखमी झाला आहे. पायाला गोळी लागल्याने सेल्समन जखमी झाला असून त्याला खाजगी रुग्णालयात उपचार साठी दाखल करण्यात आले आहे. या मॉलमध्ये पिस्तूल साठी लेदर पाकीट खरेदी करत असताना, ही घटना घडल्याचे पोलिसांचे सांगणे आहे. सातारा तालुका पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, महामार्गावर शेंद्रे गावच्या हद्दीत प्रियांका शु माॅल आहे. तेथे आज (दि.21) दुपारी गोळीबार झाल्याने परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोन दिवसापूर्वी पाटण तालुक्यातील मोरणा विभागात फायरिंग झाले होतं. आता साताऱ्यात झालेल्या फायरिंगमुळे लोकांच्यात घबराट उडाली.
सदरील पिस्टलधारी व्यक्ती अहमदनगर जिल्ह्यातील असून पोलिसांनी संबंधिताला ताब्यात घेतले आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबार नक्की कसा झाला, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नसून अनावधानावपणे झाल्याची बोलले जात आहे.