कृषीताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसातारा

आ. बाळासाहेबांनी घेतला कराड उत्तरमधील भाजप नेत्यांचा समाचार म्हणाले…

सत्ता आल्यानंतर यशवंतराव चव्हाणांचा अर्धपुतळा बसवणार

कराड | ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या बेरजेचे राजकारण या विचाराने आम्ही बेरजेचे राजकारण करून बाजार समितीच्या निवडणुकीत एकत्र आलो आहोत. आम्ही स्वार्थासाठी नाही तर निस्वार्थीपणे काम केले. आमच्या ताब्यात आली तेव्हा 15 ते 20 हजार शिल्लक होती. आमच्याकडून सत्ता गेली तेव्हा अडीच कोटीची शिल्लक होती. मार्केट कमिटीमध्ये सत्ता आल्यानंतर यशवंतराव चव्हाण यांचा अर्ध पुतळा बसवणार आहोत. उत्तर मधील भाजपमधील मंडळी कधीच माझ्या बरोबर नसतात. कधी ते या गटात तर त्या गटात असतात, त्यामुळे आमच्यावर त्यांचा कधीच फरक पडत नाही, आम्ही सक्षम आहोत असा जोरदार टोला भाजपाच्या उत्तरमधील पदाधिकाऱ्यांना आमदार बाळासाहेब पाटील यांनी लगावला.

बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित परिषदेत ते बोलत होते. भाजपचे पत्रकार चिटणीस अतुल भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, मदनराव मोहिते, अॅड. आनंदराव पाटील-उंडाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे, कृष्णा कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, माजी सभापती देवराज पाटील, दयानंद पाटील,जयंत काका पाटील, कराड दक्षिण तालुकाध्यक्ष धनाजी पाटील, अॅड. विश्वासराव निकम आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

अतुल भोसले म्हणाले, “सहकारी संस्थात पक्षविरहित निवडणूक झाल्या पाहिजेत. त्यानुसार आम्ही सहकारात चांगले काम करणारे लोक एकत्र येऊन शेतकरी प्रथम हे ब्रीदवाक्य घेऊन या निवडणुकीत उतरलो आहोत. २०११रोजी महाआघाडी करून बाजार समितीचे कामकाज चांगले चालवले. त्यातील उर्वरित शेतकरी निवास, शेतकऱ्यांची आरोग्य सेवा देणे यासह अन्य नवीन कामे करणार आहोत. निवडणुकीत मतदारांची साथ आम्हाला असल्यामुळे शेतकरी विकास पॅनेल भरघोस मतांनी निवडून येईल.” यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी बागेतल्या माझ्यासारखे राजकारण केले, असा आरोप कर आनंदराव पाटील म्हणाले, ‘रोपटे वाळायला लागले, की पाणी घालायचे व वाढायला लागले, की कटिंग करायचा धंदा त्यांनी केला. त्यांनी ४६ कोटींचा प्रस्ताव रद्द केला. २३ कोटींची शासनाची सबसिडी घेतली नाही. संस्था वाढवायच्या नाहीत हेच धोरण असल्यामुळे त्यांनी तो प्रस्ताव नाकारला. प्रशांत यादव यांनी प्रास्ताविक केले. जगदीश जगताप यांनी आभार मानले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker