दूध भेसळ प्रकरण : मसूर भागातील 9 जण ताब्यात, 5 गाड्या जप्त

कराड। कराड तालुक्यातील मसूर परिसरामध्ये नवीन कवठे, हेळगाव, खराडे, केंजळ या दूध भेसळ करणाऱ्या ठिकाणी सातारा पोलिस व अन्न भेसळ विभागाने छापे टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत दुधामध्ये केमिकल, पावडर, तेल याची भेसळ करीत असताना 9 जणांना ताब्यात घेण्यात आले असून 9 हजार लिटर भेसळयुक्त दुध, 1 मारुती रिटस् कार, 4 छोटा हत्ती अशी वाहने जप्त करण्यात आली आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड तालुक्यातील मसूर परिसरामध्ये नवीन कवठे, हेळगाव, खराडे, केंजळ या गावामध्ये काही लोक दुधामध्ये केमिकल, पावडर, तेल याची भेसळ करून नागरीकांना भेसळयुक्त दुधाची विक्री करुन त्यांच्या जिवाशी खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिस अधीक्षक समीर शेख यांना मिळाली होती. या बातमीच्या अनुषंगाने अन्न सुरक्षा विभागाचे मदतीने छापे टाकून मोठी कारवाई करण्यात आली आहे. भेसळयुक्त दूध व दुधात भेसळ करण्याकरीता लागणारे व्हाईट लिक्वीड, सोडीयम बायकार्बोनेट, वे पिरॅमिट पावडर, रिफाइंड सोयाबीन तेल असे साहित्य तसेच भेसळयुक्त दुधाची वाहतूक करण्यासाठी वापरलेली वाहने व नागरीकांच्या जिवाशी खेळणारी टोळी जेरबंद करून पुढील कारवाईकामी अन्न सुरक्षा विभाग सातारा यांचे ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, मदन फाळके तसेच अन्न व सुरक्षा विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी इम्रान हवालदार, चंदना रुपनवर, प्रियांका वायकर यांचे अधिपत्याखाली 4 पथकांनी छापा टाकला.
अन्न सुरक्षा विभागाचे ताब्यात कारवाई कामी दिलेला मुद्देमाल व इसमांची नावे-
1) बजरंग पांडुरंग जाधव (रा. खराडे, ता. कराड), 2) गणेश सुनिल पनासे (रा. हेळगांव, ता. कराड), 3) सोमनाथ रंगराव कदम (रा. गायकवाडवाडी, ता. कराड), 4) शरद वामन घार्गे (रा. नवीन कवठे, ता.कराड), 5) सचिन शंकर यादव (रा. नवीन कवठे, ता. कराड), 6) गणेश सुभाष मसुगडे (रा. नवीन कवठे, ता.कराड), 7) अर्जुन कुमार श्रीकांत गौतम (रा. उत्तरप्रदेश), 8) विवेक कुमार श्रीरामचंद्र गौतम (रा. उत्तरप्रदेश), 9) अजय कुमार गौतम (रा. उत्तरप्रदेश)
वाहने-
1) टाटा छोटा हत्ती क्रमांक (एम.एच. 50-7409), 2) महिंद्रा जितो क्रमांक- (एम. एच. 50 एन- 2636), 3) पियागो अपे क्रमांक (एम.एच.19 सी.जे. 0273), 4) छोटा हत्ती क्रमांक (एम.एच.04 जे.के. 7551), 5) मारुती रिटस क्रमांक (एम.एच.04 जी. एम. 2793)
मुद्देमाल-
1) 1 हजार लिटर दुध, 2) 10 लिटर पॅराफिन केमिकल, 3) 45 किलो वे पिरॅमिट पावडर, 4) 50 लिटर सोयाबीन तेल.
सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, विश्वास शिंगाडे, मदन फाळके, अन्न सुरक्षा अधिकारी इम्रान हवालदार, वंदना रुपनवर, प्रियांका वायकर, पोलीस अंमलदार सुधीर बनकर, अतिष घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, साबीर मुल्ला, लक्ष्मण जगधने, मंगेश महाडीक, सचिन साळूंखे, लैलेश फडतरे, प्रविण फडतरे, हसन तडवी, राकेश खांडके, सनी आवटे, गणेश कापरे, राजू कांबळे, मोहन पवार, विशाल पवार, शिवाजी भिसे, अविनाश चव्हाण, ओंकार यादव, स्वप्नील कुंभार, प्रविण कांबळे, रोहित निकम, सचिन ससाणे, धीरज महाडीक, केतन शिंदे, पृथ्वीराज जाधव, वैभव सावंत, मयुर देशमुख, मोहसिन मोमीन, अमृत कर्पे, पंकज बेसके, शिवाजी गुरव यांनी सदरची कारवाई केली आहे.