साताऱ्यात ४० पोलिसांचे कोंबींग ऑपरेशन : पिस्टल, कोयता, तलवारी जप्त
सातारा | सातारा स्थानिक गुन्हे शाखेकडील ४० पोलीस अंमलदारांची स्वतंत्र ६ पथके तयार करुन आकाशवाणी झोपडपट्टी, नामदेववाडी झोपडपट्टी, बुधवारनाका, लक्ष्मी टेकडी झोपडपट्टी, वनवासवाडी एम.आय.डी.सी या ठिकाणी कोबींग ऑपरेशन ऑपरेशन राबविण्यात आले. या कोंबींग ऑपरेशन दरम्यान २ देशी बनावटीची पिस्टल व ५ जिवंत काडतुसांची कारवाई, ३ कोयता/ तलवार बाबतची कारवाई, २ हद्दपार इसमांचेवर म.पो.का.क. १४२ अन्वयेची कारवाई, १ पाहिजे असलेला आरोपी अटक, १ फेरअटक आरोपी अटक अशी कारवाई करून १,८४,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.”
१)सातारा शहरातील मोळाचा ओढा ते महानुभव मठ जाणाऱ्या रोडवर रुद्राक्ष टॉवर्स इमारतीचे समोर स्वप्नील पोपट जाधव (वय- ३२ वर्षे, रा. सराफवाडी ता. इंदापूर जि. पुणे) याचे कब्जात ६५,६००/-रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल (अग्नीशस्त्र), ३ जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त केला.
२) अजंठा चौक सातारा येथील हायवे रोडचे पुलाखाली शशिकांत सुभाष साळूंखे (रा. तांदुळवाडी, ता. कोरेगाव) याचे कब्जात १,१५,४००/- रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल, २ जिवंत काडतुसे, १ स्प्लेंडर मोटार सायकल असा मुद्देमाल जप्त केला आहे.
३) सातारा शहरातील चंदननगर सातारा येथील पावतका येथे अनिकेत वसंत पाटणकर (वय- २८ वर्षे रा. अंगणवाडी शेजारी चंदननगर सातारा) याचे कब्जात ५००/-रुपये किमतीचा लोखंडी कोयता बाळगल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली.
४) सातारा शहरातील आय. टी. आय समोर सुदर्शन राजू गायकवाड (वय- २१ वर्षे, रा. आकाशवाणी झोपडपट्टी सातारा) याचे कब्जात ५००/- रुपये किमतीचा लोखंडी कोयता बाळगल्याने कारवाई केली.
५) सातारा शहरातील आकाशवाणी झोपडपट्टी मध्ये जुने शहरी पोलीस ठाणे ते आकाशवाणी झोपडपट्टीमध्ये जाणारे रोडवर संदिप पप्पू शेख (वय- १९ वर्षे रा. आकाशवाणी झोपडपट्टी सातारा) याचे कब्जात २०००/- रुपये किमतीची तलवार बेकायदेशीररित्या बाळगल्याने कारवाई करण्यात आली.
६) सातारा शहरातील अंजली कॉलनी शाहुपूरी सातारा येथे प्रज्वल प्रविण गायकवाड (वय- २४ वर्षे रा. अंजली कॉलनी शाहुपूरी सातारा) यास हद्दपारीचा आदेशाचे उल्लघंन केल्याने ताब्यात घेण्यात आले.
७) सातारा शहरातील पॉवरहाऊस झोपडपट्टी मंगळवारपेठ सातारा येथे विकास मुरलीधर मुळे (वय- २२ वर्षे रा. पॉवरहाऊस झोपडपट्टी मंगळवारपेठ सातारा) यास हद्दपार आदेशाचे उल्लघंन केल्याने कारवाई केली.
८) रहिमतपूर पोलीसांना गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी विक्रम कुमारसिंह चव्हाण (वय- ४१ वर्षे, रा. २३ दुर्गापेठ सातारा) यास ताब्यात घेवून पुढील कार्यवाहीसाठी रहिमतपूर पोलीसांच्या ताब्यात दिला आहे.
९) शाहुपूरी पोलीस ठाण्यात फेरअटक आरोपी दत्तात्रय उत्तम घाडगे (रा. दौलतनगर- सातारा) ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, मदन फाळके, मधुकर गुरव, पोलीस अंमलदार दिपक मोरे, तानाजी माने, सुधीर बनकर, नंदकुमार चव्हाण, विश्वनाथ संकपाळ, अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, विनायक राऊत, शरद बेबले, साबीर मुल्ला, लक्ष्मण जगधने, लैलेश फडतरे, सचिन साळुंखे, दिपाली यादव, प्रविण फडतरे, राकेश खांडके, सुनीर मुल्ला, अमोल माने, विनोद भोसले, अमित झेंडे, अजय जाधव, मोहन नाचण, गणेश कापरे, अमित माने, मनोज जाधव, प्रमोद सावंत, अर्जुन शिरतोडे, शिवाजी भिसे, मोहन पवार, ओंकार यादव, प्रविण कांबळे, विक्रम पिसाळ, अमित सपकाळ, राजू कांबळे, स्वप्नील कुंभार, अरुण पाटील, सचिन ससाणे, रोहित निकम, पुरुषोत्तम वाघमारे, केतन शिंदे, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, वैभव सावंत, स्वप्नील दौंड, मोहसिन मोमीन, मयुर देशमुख, संकेत निकम, शकुंतला सणस, मोनाली निकम, आदिका वीर, प्रिती पोतेकर, अरुराधा सणस, माधवी साळूंखे, शिवाजी गुरव, पंकज बेसके, अमृत कर्पे, संभाजी साळूंखेयांनी सदरची कारवाई केली.