ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराजकियराज्यसातारा

आ. मकरंद पाटील याचं ठरलं : प्रवास साहेबांसोबत मुक्काम अजित दादांसोबत

सातारा | राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार यांच्या शपथविधाला असणारे वाई मतदार संघाचे आमदार मकरंद पाटील यांनी पुढील 24 तासात भूमिका बदलली अन् खासदार शरद पवारांच्या गाडीतून प्रवास केला. आता तो प्रवास विसरून आमदार मकरंद पाटील यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शरद पवार यांच्यासोबत प्रवास करणारे आ. मकरंद पाटील यांनी मुक्काम अजित दादांच्या गटात करण्याचे ठरवले आहे. या मुक्कामासाठी आमदारांना मंत्रिपद देण्याची घोषणाही करण्यात आली.

वाई, महाबळेश्वर, खंडाळा तालुक्यांतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह मकरंद पाटील यांनी देवगिरी बंगल्यावर जाऊन निर्णय जाहीर केला. मकरंद पाटील यांना मंत्रिपद देण्याची घोषणा यावेळी अजित पवार यांनी केली. सातारा जिल्ह्यात अजितदादांच्या गटात आता तीन आमदारांचा समावेश झाला असून, वाई मतदारसंघातील कार्यकर्तेही त्यांच्यासोबत राहणार आहेत. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर साहेब की दादा अशी सर्वांचीच मनःस्थिती झाली होती. मकरंद पाटील यांचे नाव अजित पवारांसोबत असलेल्या आमदारांच्या यादीत होते.

या सर्व घडामोडीनंतर आठवडा उलटण्या अगोदरच आमदार मकरंद पाटील यांनी कोलांटी उडी घेतली आहे. दुपारीच वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यांतील कार्यकर्त्यांसह मकरंद पाटील हे अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर दाखल झाले. त्यांनी दादांसोबत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी विधान परिषेदेचे माजी सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, आ. दिपक चव्हाण, शशिकांत पिसाळ, राजेंद्र राजापुरे, बाळासाहेब सोळस्कर, अमित कदम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

तात्या खासदार, एक मुलगा आमदार, दुसरा चेअरमन मग निर्णय काय?
माजी खासदार कै. लक्ष्मणतात्या पाटील यांचे शरद पवार यांच्याशी जवळीक राहिली होती, त्यामुळे तात्या खासदार, मुलगा आमदार आणि दुसऱ्या मुलाला सातारा जिल्हा बॅंकेचे चेअरमनपद दिले होते. या सर्व घडामोडीत चेअरमनपदावर व आ. मकरंद पाटील यांना अलीकडे अजित पवार यांनीही ताकद दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मकरंद पाटील यांच्या निर्णयाबाबत अंदाज बांधणे कठिण जात होते, ते काय निर्णय घेणार याची उत्सुकता जिल्ह्यात होती. याच दरम्यान, कराडला यशवंतराव चव्हाण समाधिस्थळी अभिवादन करण्यासाठी खासदार शरद पवार आले होते. त्या वेळी त्यांच्या गाडीत बसून आमदार मकरंद पाटील आले होते. त्यांनी सर्वांना धक्का दिला होता. तसेच सोशल मिडियावर आम्ही साहेबांसोबत असे पोस्टही शेअर केल्या होत्या.

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker