सातारा जिल्ह्यातील माण- खटाव तालुक्यात रेल्वे येणार? : रेल्वेमंत्र्यांच्या सर्व्हेच्या सूचना
सातारा । जलसंधारण, एमआयडीसी, पुणे-बंगळुरू ग्रीन महामार्गानंतर आता आमदार जयकुमार गोरे यांनी माण- खटाव तालुक्यांत प्रवास सुखकर होण्यासाठी रेल्वे आणण्याची तयारी केली आहे. पुसेगाव-दहिवडी – म्हसवड- माळशिरस पंढरपूर लोहमार्ग मिळावा, अशी मागणी श्री. गोरे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे आज केली. त्यावर रेल्वेमंत्र्यांनी मार्गासाठी सर्व्हे करण्याच्या सूचना अधिकान्यांना दिल्या आहेत.
माण तालुक्यात जागा उपलब्ध असल्याने येथे कॉरिडॉर एमआयडीसी उभारली जाणार आहे. या विकासाच्या गतीला वेगाने व सुखकर प्रवास करणे शक्य होण्यासाठी नवीन लोहमार्ग माण तालुक्यातून नेण्यासाठी आमदार गोरेंनी प्रयत्न सुरू केले आहेत.
पुसेगाव दहिवडी-म्हसवड- माळशिरस पंढरपूर लोहमार्ग मिळावा, अशी मागणी त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली. या या वेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार राहुल कुल आदी उपस्थित होते. या मागणीवरून रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सातारा- पंढरपूर मार्गावर सर्व्हे करण्याच्या सूचना दिल्या. रेल्वेमुळे माण- खटाव तालुक्यातील दळणवळण सुखकर होण्यास मदत होणार आहे.