राहूल गांधीचा छचोरी सारखा फ्लाईंग किस्स : चित्रा वाघ
पाटण | मणिपूर बरोबर पश्चिम बंगाल, राजस्थानमध्ये घडलेल्या घटनेवर विरोधीपक्ष बोलायला तयार नाही. विरोधकांकडून कुठेतरी राजकारण आणलं जातंय, याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. मणिपूर मधील घटने संदर्भात बोलायला सरकार तयार आहे. मात्र विरोधी पक्षाला निमंत्रण देऊन देखील चर्चेला येत नाही. राहुल गांधी यांची ही काय पहिली वेळ नाही, या आधी डोळा मारणे, मिट्या मारणे हे प्रकार केलेले आहेतच. लोकशाहीचा मंदिरात जिथे अशी छचोरी सारखा फ्लाईग किस्स करणं, रोड रोमिओ सारख वागणं हे राहुल गांधींना शोभत का? अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली.
ढेबेवाडी येथे प्राना फाऊंडेशन यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमास आज चित्रा वाघ उपस्थित होत्या. तत्पूर्वी त्यांचे साईगडे, तळमावले येथे स्वागत करण्यात आले. तळमावले येथे कविता कचरे यांनी स्वागत केले, तेथे चित्रा वाघ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माथाडी नेते नरेंद्र पाटील, डाॅ. प्राची पाटील उपस्थित होत्या. कायदा सुव्यवस्था आज बिघडली आहे, यावर चित्रा वाघ (Chitra Vagh) म्हणाल्या, आमचं सरकार आले म्हणून अत्याचार वाढलेत, अस म्हणायचं का. अत्याचार चालूच आहेत, परंतु त्या वेळचं आणि आता सरकार त्यावर काय भूमिका घेतय हे महत्वाचे आहे. जेव्हापासून आमचे सरकार आले आहे, तेव्हापासून आरोपींना पाठिंशी घातल गेले नाही. ज्या- ज्या वेळेला अशा घटना घडल्या त्या वेळेला आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे काम झालेलं आहे. सरकार, पोलिस आहेच, परंतु समाज म्हणून तुमची, आमची जबाबदारी आहे, ती आपणही पार पाडावी.
आमदारांवर कारवाई होणार : चित्रा वाघ
अल्पवयीन मुलीवर अत्याचार होतो त्याची बातमी एक पत्रकार करतो आणि मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारतो याच्यावर संतापलेला आमदार त्या पत्रकाराला शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करतो. या संदर्भामध्ये विचारले असता चित्रा वाघ यांनी संबंधित आमदारावर कारवाई होईल. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, हे लोकांचे लोकांसाठी असलेल सरकार आहे. आमचे नेते देवेंद्र फडणवीस हे कोणीही कायद्याच्या विरोधात काम केल, तर त्याच्यावर कारवाई निश्चित करतील.