विशाल वामनराव पाटील
मराठ्या जागा हो, राजकीय पक्षांचा नव्हे समाजाचा धागा हो
अतिशय खेदाने या अोळी लिहाव्या लागत आहेत. कारण राज्यात निघालेल्या 57-58 मोर्चांनी केवळ महाराष्ट्र राज्य नव्हे तर अवघा देश व जगाची दखल घ्यायला लावलेल्या मराठा समाजासाठी अशा अोळी लिहाव्या लागणे हे दुर्देव म्हणावे लागेल. आता आमच्या काही तरूणांसाठी बापासाठी राजकीय नेता अन् समाजापेक्षा राजकीय पक्ष मोठा झाला असल्याचे दिसत आहे. जालन्यातील मराठा समाजातील आंदोलकांवर लाठीमार झाल्यानंतर अनेक ठिकाणी उत्स्फूर्त सहभाग पहायला मिळाला. तर काही ठिकाणी नेता, पक्ष महत्वाचा म्हणून अनेकांनी पाठही फिरवली. सत्तेसाठी, नेत्यासाठी समाजाचा राजकीय वापर होतो, हे अनेकदा पहायला मिळाले. पण आता कार्यकर्ते, समाजातील शंड डोक्याची तरूण- तरूणी, कार्यकर्ते हेही राजकीय वापर करताना दिसू लागले आहे.
जालन्यातील सराटी येथे झालेल्या आंदोलनातील लाठीमार नंतर अनेक ठिकाणी बंदची हाक देण्यात आली. तर काही ठिकाणी सकल मराठा समाजाकडून निषेध व्यक्त करण्यात आला. खरेतर या घटनेमुळे बंद, निषेध करणे योग्यच होते. मात्र, सध्याचे सरकार काॅंग्रेस पक्ष सोडला तर भेळमिसळ असलेले आहे. तेव्हा याठिकाणी येताना प्रत्येकजण पक्षाचे पायताण बाजूला ठेवून येणं अपेक्षित असल्याने अनेक बांधव आलेला दिसून आला नाही. भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचे सरकार असल्याने पक्ष आदेश म्हणा किंवा पक्ष प्रेम, बापावरील (नेता) प्रेम यामुळे जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, संघटक किंवा नेत्यांनी पंगतीला वाटलेली पदाधिकारी दिसले नाहीत. आपल्या नेत्यावर केवळ विरोधातील सरपंच जिल्हा परिषद, लोकप्रतिनिधी किंवा साधा एखाद्या कार्यकर्त्यांने आरोप केला की एखाद कुत्रं बोबालणारं नाही, एवढ्या मोठ्यानं रस्त्यावर, चाैकात येवून आरोप- प्रत्यारोप करतात. तेव्हा यांना वेळ, बापावर (नेत्यावर) झालेलं आरोप म्हणजे दोन दिवसापूर्वी मराठा बांधवावर झालेल्या लाठी हल्ला, छऱ्यापेक्षा मोठे वाटतात. तेव्हा असा ताठाखालचा मांजर असलेल्या कार्यकर्त्यामुळे मराठ्या जागा हो, राजकीय पक्षांचा नव्हे तर समाजाचा धागा हो असे म्हणावे लागत आहे.
पश्चिम महाराष्ट्रात मराठा समाजाचे मोर्चे म्हणजे सरकारला धडकी भरवणारे झाले. यामध्ये सातारा व कोल्हापूर येथे छत्रपतींची गादी असल्याने येथील राजघराण्यांचा वारसा असलेले राजे थेट मोर्चात दिसले. काल मनोज जरांगे यांची छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे यांनी भेट घेत दोषीवर कारवाईंची मागणीही केली. यामध्ये सातारा ही राजधानी असताना येथे पोलीस प्रशासन अलर्ट होते, मात्र समाज झोपी गेलेला दिसून आला. साताऱ्यातील पोवई नाक्यावरील शिवतीर्थावरील सकल मराठा मोर्चाची दखल देशाने घेतली होती. त्यामुळे राज्याला अपेक्षा होती, साताऱ्यात या घटनेचे तीव्र पडसाद पडतील. कोल्हापूरातून काहीतरी हालचाली होतील. परंतु, राजकीय पक्षांची झूल अंगावर घेतलेल्या कार्यकर्त्याला, त्याच्या बापाला (नेत्याला) समाज महत्वाचा वाटला नाही. त्यामुळेच साताऱ्यात काहीच झालेलं नाही अशा पध्दतीने सर्वकाही सुरू होते. या जिल्ह्यातून बापासाठी गळा फाडणारा कार्यकर्त्या अन् आपल्या पक्षासाठी बोबालणारा बाप मराठा समाजासाठी रस्त्यावर उतरताना दिसला नाही. उलट, आमच्या बापाने, पक्षाने काय केलं त्यांनी काय केलं नाही. या कट्ट्यावरील गप्पात समाजातील तरूण कार्यकर्ता दिसला. तेव्हा हाच राजकीय मराठा तरूण कार्यकर्ता कदाचित उद्या दिसला समाजासाठी रस्त्यावर उतरलेला दिसला नाही तर आश्चर्य वाटाया नको. कारण राजकारणातील बाप अन् राजकीय पक्षाच समाजापेक्षा मोठा असलेल्यांकडून काय अपेक्षा करायची असा आता प्रश्नच शिल्लक राहत नाही.