G-20 : भारतीय नौदलाच्या क्विझ मध्ये कराडच्या कोटा अकॅडमीचे यश

कराड | भारतीय नौदलाच्या वतीने भारतात झालेल्या G-20 परिषदेच्या निमित्ताने G-20 थिंक ही देशभरातील सर्व शाळांसाठी क्विझ आयोजित करण्यात आली होती. देशभरातून 11, 741 शाळांनी यामध्ये सहभाग घेतला होता. या क्विझमध्ये कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत यश मिळवून दुसऱ्या फेरीसाठी ते पात्र झाले आहेत.
यामध्ये वेदांतिका काकडे, रिया कांबळे व नील पाटील हे विद्यार्थी सहभागी झाले होते. पहिल्या फेरीत यश मिळवल्याबद्दल त्यांचे कोटा अकॅडमीचे संचालक डॉ. महेश खुस्पे, संचालिका सौ. मंजिरी खुस्पे, कु. मैथिली खुस्पे, प्राचार्या सौ. जयश्री पवार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
या क्विझची दुसरी फेरी 3 ऑक्टोंबर रोजी होणार असून 10 ऑक्टोंबर रोजी क्वार्टर फायनल असणार आहे. या क्विझची नॅशनल फायनल 18 नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडिया येथे होणार आहे. या इंडियन नेव्हीच्या आंतरराष्ट्रीय क्विझमध्ये प्रथम फेरीत यश मिळवल्याबद्दल कोटा ज्युनिअर कॉलेजचे व कोटा अकॅडमी चे सर्वांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.