मंत्री गिरीश महाजन म्हणाले… सगळे देव पाण्यात घालून आमचं कसं फाटेल (Video)
कराड येथील विमानतळावर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून मंत्री श्री. महाजन यांचे स्वागत
– विशाल वामनराव पाटील
नाना पटोले, संजय राऊत, वडेट्टीवार काय म्हणतात. ते आप-आपल्या परीने अर्थ काढतात. काल एवढे कार्यक्रम झाले, देवगिरी बंगल्यावरील कार्यक्रमालाही अजित दादा नव्हते. त्यांची तब्बेत खराब असल्यामुळे ते नव्हते. तेव्हा सगळे देव पाण्यात घालून आमचं कसं फाटेल आणि त्याचं कसं जमेल यासाठी आप- आपल्या परिने अर्थ काढण्याचा प्रकार सध्या राज्यात सुरू असल्याचे टीका ग्रामविकास मंत्री गिरीश महाराजन यांनी केली. कराड येथील विमानतळ येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. इस्लामपूर (जि. सांगली) येथे एका कार्यक्रमाला जाताना श्री. महाजन बोलत होते.
कराड येथील भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांचे स्वागत केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष एकनाथ बागडी, कराड दक्षिणचे तालुकाध्यक्ष पै. धनाजी पाटील, अजय पावसकर, प्रमोद शिंदे, माजी मंत्री सदाभाऊ खोत, आ. गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख, काकासाहेब ढेबे, कराडचे प्रातांधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार विजय पवार, पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर आदी उपस्थित होते.
सामनाच सध्या व्हेंटिलेटरवर
सरकारी रुग्णालय मृत्यू शयेवर आहेत अशी जाहरी टीका सामना पेपर मधून खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्या प्रश्नावर मंत्री महाजन म्हणाले , सामनाच सध्या व्हेंटिलेटरवर आहे. नांदेडची घटनेत एका दिवसात 24-25 मृत्यू होणे ही चितेंची बाब आहे. त्यासाठी मी स्वतः व पालकमंत्री तेथे जाऊन आलो आहोत. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तेथे जाऊन आले आहेत. हजार- हजार पेशंट असताना 7-8 पेशंट मृत्युमुखी पडणे, हा रेषो तसा आव्हरेज आहे. वाढत्या मृत्यूबाबत शासन गंभीर आहे. मृत्यू झालेला आकडा हा कमी जास्त होत असतो त्यामुळे राज्य मृत्यू शयेवर आहे असे म्हणणे चुकीचे आहे. सामनाने वेगळं काही म्हणावं अशी अपेक्षा आम्हांला नाहीच.
निवडणुकांना सरकार घाबरत नाही
निवडणुका लांबणीवर टाकून सरकार निवडणुकांसाठी तयार नसल्याचे म्हटले जात आहे. या प्रश्नावर मंत्री महाजन म्हणाले, निवडणुकीसाठी सरकार घाबरत आहे, हे म्हणणे योग्य नाही. मात्र, निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर करायचा हे निवडणूक आयोगाचा निर्णय आहे. संभाव्य लोकसभा विधानसभेच्या उमेदवारी संदर्भात बोलताना ते म्हणाले, लोकसभा विधानसभेचे उमेदवारी कोणाला द्यायची हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय असतो. सध्या अनेक वेगवेगळ्या लोकांची यांना खासदार करणार यांना आमदार करणार अशी नावे येत आहेत. मात्र त्याचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील पक्षश्रेष्ठ व आदेश देतील त्याप्रमाणे ते उमेदवार निवडणूक रिंगणात राहतील