किल्ले प्रतापगडावर मशाल महोत्सव : हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत 364 मशाली प्रज्वलित
सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देत असलेल्या किल्ले प्रतापगडावरील आई भवानी मातेच्या मंदिराला 364 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त गडाच्या बुरुंजावर 364 मशाली प्रज्वलित करून हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत मशाल महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी किल्ले प्रतापगडावर नयनरम्य आतिषबाजी देखील करण्यात आल्याने शुक्रवारी गडावर शिवकाळ अवतरला होता.
किल्ले प्रतापगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने ओळखला जात असून तो साक्षात आई भवानीच्या प्रतिष्ठापनेने ही पावन झालेला हिंदवी स्वराज्यातील एकमेव महत्त्वपूर्ण गड म्हणून देखील ओळखला जातो. नवरात्रीच्या काळामध्ये लाखो भाविक या गडावरील आई भवानी मातेच्या दर्शनाला येत असतात. गडावरील आई भवानी मातेच्या मंदिराला 364 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त दरवर्षीच शिवभक्त गडावरील बुरुजांवर मशाल प्रज्वलित करून हा मशाल महोत्सव साजरा करत असतात. दरवर्षी या मशाल महोत्सवात एक मसाल्याची भर केली जाते.
यंदा 364 मशाली प्रज्वलित करून हा मशाल महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. या मशाल महोत्सवासाठी राज्यातून हजारो शिवभक्त किल्ले प्रतापगडावर उपस्थित होते यावेळी पारंपारिक वाद्याच्या निनादात शिवप्रेमी मावळ्यांनी मर्दानी खेळायचे प्रात्यक्षिके दाखवून मशाल महोत्सवात आणखीनच रंगात आणली होती त्यामुळे शिवभक्त मावळ्यांमध्ये देखील नवचैतन्य निर्माण झाल्याचे पहिला मिळाले