‘सह्याद्रि’च्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ

मसूर प्रतिनिधी। गजानन गिरी
यशवंतनगर (ता.कराड) येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३-२४ सालामधील सुवर्णमहोत्सवी गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन, महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते व सर्व संचालकांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवार दिनांक ०३ नोव्हेंबर, २०२३ रोजी सकाळी १०.०० वा. वाजता संपन्न होणार असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी दिली.
सन २०२३-२४ हंगामासाठी कारखान्याकडे २१५७६.२१ हेक्टर ऊसाची नोंद गळीतासाठी झालेली आहे. संपूर्ण ऊसाचे गळीत करण्याचेदृष्टीने तोडणी वहातुकीचे नियोजन करण्यात आलेले आहे. कारखान्यातील ओव्हरव्हॉलिंगची कामे पूर्ण झालेली आहेत.
कारखान्याचे सभासद, शेतकरी, हितचिंतक यांनी गळीत हंगाम शुभारंभाकरीता अगत्य उपस्थित रहावे, असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाच्यावतीने कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी केले आहे.