ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसांगलीसाताराहवामान
कोयना धरण 100 टक्के भरले अन् सर्व दरवाजे उघडले
पाटण – कोयना धरण पूर्ण क्षमतेने 100 टक्के भरले असून पाण्याची आवक सुरू असल्याने धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. पाण्याची आवक वाढत असल्यामुळे आज (दि. ५ सप्टेंबर) सकाळी ९:०० वा. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे ४ फुटांपर्यंत उघडून सांडव्यावरून ३७,५२७ क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येणार आहे.
कोयना पाणी नदीपात्रात धरण पायथा विद्युत गृहामधून २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातून नदीपात्रात एकूण ३९,६२७ क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोयना नदीपात्रात पाणीपातळीत वाढ होत असताना धरण क्षेत्रातही पाऊस सुरू आहे. त्यामुळे पावसाच्या प्रमाणानुसार पाण्याचा विसर्ग कमी जास्त करण्यात येणार आहे.