छ. शिवरायांनी सुरत लुटलीच नाही, इतिहासकार खरे की देवेंद्र फडणवीस? : पृथ्वीराज चव्हाण

कराड ः- चारशे पारची घोषणा, दोन तृतीयांश बहुमत द्या आम्हांला संविधान बदलायच आहे. त्यांची जी वक्तव्ये झाली त्यामुळे संविधानाला धोका असल्याचे जनतेने ठरवलेलं आहे. त्यामध्ये फेक नेरेटीव्ह काय आहे. आता ते छ. शिवाजी महाराजांचा नवा इतिहास सागातायंत, छ. शिवरायांनी सुरत लुटली. स्वराज्याकरता, परकीय आक्रमण रोखण्याकरता केलं. आता तुम्ही ते घडलंच नाही म्हणता, म्हणजे इतिहासकार खोटे आहेत अन् देवेंद्र फडणविसांना इतिहास जास्त चांगला माहिती आहे का? असा प्रश्न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
खोडशी (ता. कराड) येथे कोयना दूध संघावर स्व. विलासराव पाटील- उंडाळकर यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमानंतर आ. पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. यावेळी युवानेते आदिराज पाटील- उंडाळकर उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाकडून फेक नेरेटीव्ह पसरवल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असल्याच्या आरोपांसह मला कितीही चक्रव्हूवात अडकविण्याचा प्रयत्न केला तरी उपयोग होणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. या प्रश्नाला आता पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिप्रश्न उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लागणार
सरकारकडे सर्व पर्याय खुले असून ज्या पध्दतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2-3 वर्ष रखडलेल्या आहेत. जनतेच्या मतदानाचा, प्रतिनिधित्व करण्याचा तसेच आरक्षणाचा अधिकार हिरावूण घेतलेला आहे. त्यामुळे या निवडणुकाही पुढे ढकलतील. विजयाची खात्री वाटत नसल्याने आणखी काही क्लुप्त्या काढतील. लोकसभा निवडणुकीला मी, शरद पवार यांनी म्हटल्याप्रमाणे 32 जागा मिळवल्या. आता त्यापेक्षा विधानसभेला महायुतीसाठी वाईट वातावरण आहे.
विधानसभेला काही पक्ष इकडचे- तिकडे जातील- पृथ्वीराज चव्हाण
विधानसभेला महाविकास आघाडीला किती जागा मिळतील या प्रश्नावर महाविकास आघाडीचे नेते माजी मुख्यमंत्री म्हणाले, किती जागा मिळतील यांचा आकडा आता नको. परंतु, अगोदर जागा वाटप होवूद्या. उद्या कोण उमेदवार कुठला कुठे उभा राहतोय. कोण कुठ हालतयं. हालचाल बरीच होणार आहे. विधासभा निवडणुकीला इकडचे पक्ष तिकडे जातील.