ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसातारासामाजिक

कर्मठ कार्यकर्ता, कार्यसम्राट व्यक्तिमत्व म्हणजे विलासकाका : काडसिध्देश्वर स्वामी

कराड | विलासराव काका हे नास्तिक तर मी आस्तिक माणूस. विज्ञानधिष्ठित माणसांवर काकांची श्रध्दा होती. काका कर्मठ कार्यकर्ता, कार्यसम्राट व्यक्तिमत्व होते. काका ईस्त्रालयाला जावून आल्यानंतर जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून राज्यात सर्वात जास्त ग्रीनहाऊस बांधली होती. आपल्या देशात दररोज 65 ते 70 कोटी दूधाची गरज आहे. देशात केवळ 15 कोटी दूध दररोज उपलब्ध होते. महाराष्ट्रात 80 टक्के दूध भेसळयुक्त असून केवळ 20 टक्के दुधाची निर्मिती होते. भारत देशात 50 टक्के लोकांना रोजगार देणारे शेती क्षेत्र असल्याचे कणेरी मठाचे मठाधिपती पुज्यश्री काडसिध्देश्वर स्वामीजी यांनी सांगितले.

खोडशी (ता. कराड) येथील कोयना सहकारी दूध संस्थेच्या परिसरात माजी सहकार मंत्री लोकनेते स्व. विलासकाका पाटील- उंडाळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी पालकमंत्री शंभूराज देसाई होते. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, खा. नितीन काका पाटील, रयत कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील, कोयना संघाचे अध्यक्ष लक्ष्मण देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव जाधव, माजी अध्यक्ष वसंतराव जगदाळे, नितीन भरगुडे- पाटील, रयत कारखान्याचे संचालक प्रदीप पाटील, बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आज दूध उत्पादनात महाराष्ट्राचा दरडोई क्रमांक नववा लागतो. कोयना दूध संघाला ऊर्जितवास्था काकांनी दिली. काकांनी कधीही विचारांशी प्रतारणा केली नाही.  कोयना दूध संघामुळे कराड- पाटण तालुक्यातील दूधाला बाजारपेठ मिळाली. काकांनी कोयना दूध संघाला मोठ्या उंचीवर नेले. काकांनी ज्या लोकांना स्पर्श केले होते, ती जिवाभावाची माणसे उपस्थित होते. सहकारी संस्था कशा चालाव्यात यांचा आदर्श काकांनी घालून दिला.

शंभूराज देसाई म्हणाले, सहकारात नियोजबध्द आणि आर्थिक शिस्त असेल तर प्रगती कशी होते हे पश्चिम महाराष्ट्राने दाखिवली. दूरदृष्टी असलेले नेते पश्चिम महाराष्ट्राला लाभलेले आहेत. काकांकडे सहकार खाते होते. तेव्हा ते राजकीय जोडे बाहेर ठेवून आल्यास सहकारी संस्था चांगल्या चालतात हे वाक्य काकाचं होते. कोयना दूध संस्था आर्थिक शिस्त असणारी संस्था आहे. जिल्ह्यातील आणि जिल्हाबाहेरील अनेक संस्था मोठ्या होण्यात काकांचा मोठा वाटा आहे.

काकांचा तिसरा पुतळा रयत कारखान्यावर

माजी सहकार मंत्री आणि कराड दक्षिणचे सलग 35 वर्षे आमदार असलेले स्व. विलासराव पाटील- उंडाळकर (काका) यांचा कोयना बॅंक, कराड आणि कोयना दूध संघ येथे पुतळा उभारण्यात आला आहे. उंडाळे खोऱ्यात शेवाळेवाडी येथे रयत कारखाना परिसरात तिसरा पुतळा लवकरच उभारण्यात येणार आहे.   

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close