तांबवेत हिरकणी मॅरेथॉनमध्ये 250 स्पर्धकांचा सहभाग

कराड – हिरकणी स्पोर्ट्स क्लब कराड व कोयनाकाठ चॅरिटेबल ट्रस्ट संचलित फुटबॉल टीम यांच्यावतीने हिरकणी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी तांबवे, सुपने, विंग आणि कोळे परिसरातील सर्व जिल्हा परिषद शाळा व हायस्कूलच्या 250 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी राष्ट्रीय राज्य पदक विजेच्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत आबईचीवाडी, येणके येथील खेळाडूंचे वर्चस्व राहिले.
रोटरी क्लब ऑफ मलकापूरचे माजी अध्यक्ष विलासराव पवार, हिरकणी स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष सलीम भाई मुजावर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, यशवंत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष निवासराव पाटील, भारती विद्यापीठचे शिक्षक तात्यासाहेब पाटील यांनी झेंडा दाखवून स्पर्धेची सुरुवात केली. स्पर्धेसाठी ओमकार खंडग, आकाश फल्ले, दादासो शिंदे, रवींद्र पाटील, बाजीराव पवार, विशाल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
विजेते स्पर्धेक पुढीलप्रमाणे ः- 10 वर्षाखालील मुले- मुली आदर्श बजरंग बाबर, काव्या विकास गरुड, 12 वर्षाखालील मुले- मुली समर्थ धनंजय सुर्वे, स्वरा तानाजी माने, 14 वर्षाखालील मुले- मुली शंभू रघुनाथ शेडगे, आदिती राजेंद्र माने अशी आहेत.