वहागांवमध्ये 150 पदवीधर महिलांच्या हस्ते नूतन इमारतीचे भूमिपूजन
जिल्हा परिषद शाळेसाठी पृथ्वीराज चव्हाण यांचा 60 लाखांचा निधी

कराड :- वहागांव (ता. कराड) येथे जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा यांच्या माध्यमातून सरपंच संग्राम पवार बाबा व सहकार्यांच्या प्रयत्नातून 60 लाख रुपये मंजूर झाले असुन शाळेचे भूमिपूजन गावातील पदवीधर महिलांच्या हस्ते घ्यायचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. गावातील तब्बल 150 पदवीधर महिलांच्या हस्ते नारळ फोडून भूमिपूजन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी सरपंच संग्राम पवार, उपसरपंच संतोष कोळी, सदस्य धनंजय पवार, आनंदी पवार, तुषार पवार, रंजना पवार, शिला पवार, सुजाता पुजारी, टॅक्स असिस्टंट विनोद पवार, केंद्र प्रमुख साळुंखे, मुख्याध्यापक पवार, विद्याधर गायकवाड, कॉन्ट्रॅक्टर अक्षय मोहिते, राहुल वायदंडे तसेच जेष्ठ नागरिक युवा कार्यकरते महिला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.
वहागांव गांव कायमच चांगल्या कामाच्या निमित्ताने जिल्ह्यात चर्चेत असते गावामध्ये शिक्षणाची चळवळ चांगल्या प्रकारे रुजत असुन जिल्हा परिषदेचे शाळा तालुक्यात प्रथम क्रमांक व जिल्ह्यात तृतीय क्रमांकावर आहे. शाळेचा पट गेली 3 वर्षे सातत्याने वाढत आहे त्यासाठी गावातून शाळेसाठी योगदान देण्याची वृत्ती सुद्धा वाढत आहे लोकसहभागातून शाळेचा कायापालट होत चालला आहे. महिलांनी शाळेच्या प्रगतीसाठी पुढाकार घ्यावा यासाठी महिलांच्या हस्ते भूमिपूजन घेऊन निर्णय प्रक्रियेत महिलांना सहभागी करून घेण्याचे क्रांतिकारी पाऊल गावाने उचलले आहे.