कृषीक्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

तारेवर आकडा टाकून वीजचोरी : रहिमतपूर पोलिसात शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

कोरेगाव | साप (ता. कोरेगाव) येथे रहिमतपूर महावितरण कंपनीच्या सब डिव्हिजनच्या भरारी पथकाने एक वर्षापासून अनधिकृतपणे वीज वाहक तारेवर आकडा टाकून घर व शेती विद्युत पंपाला वीज जोडणी करून वीज चोरी करण शेतकऱ्याला चांगलंच महागात पडलं आहे. संतोष विठ्ठल कुंभार याच्या विरोधात रहिमतपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी रहिमतपूर सब डिव्हिजन महावितरणचे सहाय्यक अभियंता युवराज वाघ यांनी फिर्याद दाखल केली आहे.

Brilliant Academy

याबाबतची अधिक माहिती अशी, रहिमतपूर सब डिव्हिजन महावितरणचे सहाय्यक अभियंता युवराज वाघ यांना साप गावातील संतोष विठ्ठल कुंभार (वय- 43 वर्ष) यांनी साप- पिंपरी फाटा येथील विद्युत ट्रान्सफार्मर वरील लघुदाब वाहिनीवरती अनाधिकृतपणे काळा रंगाच्या केबलच्या साह्याने तारेवर आकडा टाकल्याचे निदर्शनास आले. याठिकाणी सुमारे साडेपाच फूट अंतरावर लाईट घेऊन घरामध्ये विजेचा वापर करत असल्याबाबत अज्ञात खबऱ्याने माहिती दिली होती. सदरील माहितीची सत्यता पडताळणीसाठी सहाय्यक अभियंता युवराज वाघ व महावितरणचे कर्मचारी रामचंद्र आनंदा मोहिते यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

Kota Academy Karad

सदर ठिकाणी संतोष कुंभार यांनी घरात व इलेक्ट्रिक शेती पंप यास अनधिकृतपणे लाईट घेतलेली दिसून आली. त्यांनी तात्काळ सदर घटनेचा पंचनामा करून त्यांना 33, 400/- रुपयांचा विद्युत बील आकारणी नोटीस बजावली. सदर बिल भरण्यास सांगितले. मात्र, संबंधिताने वारंवार सूचना देऊनही त्याने आजतागायत वीज चोरीच्या बिलाचा भरणार न केल्याने संशयित संतोष विठ्ठल कुंभार याच्या विरोधात वीज अधिनियम 2003 चे कलम 135 (1) अन्वये महावितरण कंपनीच्या वतीने कायदेशीर तक्रार नोंद केली आहे आहे. तपास पोलीस हवालदार महेश शेडगे करीत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker