Satara News : देशसेवा बजावताना साताऱ्यातील जवानाचा पंजाबमध्ये मृत्यू
वडूज | वडूज (ता. खटाव) येथील जवान मयुर जयवंत यादव (वय- 29) यांचे पंजाब कँम्प येथे देशसेवा बजावताना अपघाती मृत्यू झाला. जवान मयुर यादव यांचे पार्थिव उद्या मंगळवारी (दि.18) वडूजमध्ये येणार आहे.
याबाबतची माहिती अशी की, मयुर जयवंत यादव हे लान्स नाईक या पदावर कार्यरत होते. अंबाला येथील कँम्प येथे देशसेवा बजावताना दुचाकीवरून जात असताना स्पीड ब्रेकर वरून जवान मयुर खाली पडले. या अपघातात त्यांच्या डोक्यास गंभीर जखम झाल्याने उपचारासाठी अंबाला (पंजाब) येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना आज (दि. 17) सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
मृत जवान मयुर यादव यांच्या पश्चात पत्नी, तीन वर्षाची मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. पंजाब येथून त्यांचे पार्थिव दिल्लीत तेथून विमानाने पुणे विमानतळावर पोहचणार आहे. पुणे येथून वाहनाने वडूजमध्ये दुपारी पोहचेल.