क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा

Satara जिल्हा पुन्हा हादरला : जावयाकडून चुलत सासऱ्याचा गोळ्या घालून खून

कोरेगाव | वाघोली (ता. कोरेगाव) येथे जमिनीच्या वादातून जावयाने चुलत सासऱ्यावर गोळीबार केल्याची घटना घडली असून सासरा सुनील शंकर भोईटे (वय- 48) याचा जागीच मृत्यु झाला आहे. या घटनेने कोरेगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पिंपोडे येथील रूग्णालयात लोकांनी मोठी गर्दी केली होती.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, वडिलोपार्जित जमिनीसंदर्भात न्यायालयात दावा दाखल आहे..सदरचा दावा सुनील भोईटे यांनी दाखल केलेला आहे, अशीही माहिती मिळत आहे. यावरून नामदेव भोईटे यांचे जावई आणि सुनील भोईटे यांच्यात वादविवाद झाले होते. आज सायंकाळी सात वाजणेचे सुमारास नामदेव याचे जावई रवी यादव व सुनिल यादव या दोघांनी वाघोली येथे सुनील भोईटे व त्यांचा मुलगा दुचाकीवरून घराकडे निघाले असताना त्यांना वाटेत अडवून भोईटे यांच्यावर पिस्तूल रोखले. त्यावेळी भोईटे यांचा मुलगा माझ्या वडिलांना मारू नका म्हणुन हात जोडून विनवण्या करीत होता. मात्र तरीही रवी यादव याने भोईटे यांच्या पोटात व छातीत तीन गोळ्या घातल्या. गोळ्या वर्मी लागल्याने सुनील भोईटे यांना तातडीने पिंपोडे बुद्रुकच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच भोईटे यांचा मृत्यू झाला.

संशयित रवी यादव व सुनिल यादव (मुळ रा. सोळशी ता.कोरेगाव) हे सध्या पुणे येथे वास्तव्यास असतात. गोळीबाराची घटना घडल्यानंतर दोघेही स्वतःहून वाठार पोलीस ठाण्यात हजर झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेसंदर्भात वाठार पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close