क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा

केळघर घाटात 100 फूट खोलदरीत JCB कोसळला

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
केळघर घाटात जेसीबी 100 फूट खोलदरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. जेसीबी चालक हा बेशुध्द पडल्याने संबधित व्यक्तीचे नाव समजू शकले नाही. परंतु घाटातून ये- जा करणाऱ्या लोकांनी 108 नंबरला फोन  एकजण जखमी तात्काळ सातारा येथे पाठवण्यात आले.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, रविवारी दुपारच्या सुमारास एक जेसीबी केळघर घाटातून चालला होता. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने जेसीबी खोलदरीत कोसळला. जवळपास 100 फूट खोल दरीत जेसीबी कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर चालक बेशुध्द पडल्याचे घटनास्थळावरील लोकांनी सांगितले.

या अपघातातील जखमीस तात्काळ सर्जेराव खुटेकर, सुनील खुटेकर, विठ्ठल खुटेकर, प्रकाश खुटेकर, स्वप्नील खुटेकर, विकास खुटेकर, विशाल खुटेकर, ऋषिकेश खुटेकर, राहुल खुटेकर, जगन खुटेकर, रमेश खुटेकर यांनी मदत केली. तसेच 108 नंबरवर फोन लावून रूग्णवाहिका बोलावून जखमीस उपचारासाठी हलविले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker