क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसांगलीसातारा

ACCIDENT : कराडजवळ महिलेला कंटेनरने चिरडले

कराड | पुणे- बेंगलोर महामार्गावर मलकापूर शहराच्या हद्दीतील हाॅटेल धनी येथे एका महिलेला कंटेनरने चिरडले. या अपघातात रस्ता क्राॅस करणारी महिला जागीच ठार झाली असून तिची अोळख रात्री उशिरापर्यंत पटलेली नव्हती. सदरील कंटेनर चालकास शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव सिध्दी कोळी (वय- 36, रा. पलूस, जि. सांगली) असल्याचे शहर पोलिसांनी सांगितले.

Kota Academy Karad

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महामर्गावर एक महिला रस्ता क्राॅस करत असताना कोल्हापूरहून सातारच्या दिशेल्या निघालेल्या लेनवर हा अपघात झाला. सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास कंटेनर क्रमांक (MH- 11- BL- 6379) हा साताऱ्याच्या दिशेला निघाला होता. मलकापूर शहराच्या हद्दीत सध्या उड्डाणपूलाचे काम सुरू असल्याने वाहतूक खोळंबा पहायला मिळत आहे. तसेच लोकांनाही ये- जा करण्यासाठी पर्यायी नवनवे मार्गांनी प्रवास करावा लागत आहे.

महामार्गावर सायंकाळी उशिरा रस्ता क्राॅस करताना महिलेला कंटेनरने चिरडल्याने वाहतुकीचा खोळंबा उडाला होता. घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दी केली होती. कराड शहर अपघात विभागाचे प्रशांत जाधव, धीरज चतुर, महाडिक यांच्यासह वाहतूक शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच वाहतूकही सुरळीत केली. सदरची महिला सांगली जिल्ह्यातील असून ती याठिकाणी कशासाठी आली होती, यांचा अधिक तपास कराड शहर पोलिस करत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker