ॲक्शनला रीएक्शन येणारच : ना. शंभूराज देसाई यांचा प्रतिहल्ला
पाटण | जळगांव जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या अगोदर मंत्री गुलाबराव पाटील आणि खासदार संजय राऊत यांच्यात राजकीय वाद सुरू झाला असून सभेत उधण्याचा इशारा देण्यात आला. यावर उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिहल्ला केला आहे.
पाटण तालुक्यातील दाैलतनगर येथे शंभूराज देसाई म्हणाले, जळगाव जिल्ह्यात आमचे आमदार किशोर आप्पा पाटील, चिमण आबा, चंद्रकांत पाटील, मंत्री गुलाबराव पाटील असतील आम्ही सगळे कार्यकर्ते शिंदे साहेबांचे आहोत. परंतु माझ्या माहितीनुसार आमचे जुने सहकारी माजी आमदार स्वर्गीय आरव तात्या यांच्या पुतळा उदघाटनाच्या कार्यक्रमास उध्दव ठाकरे येत आहेत. जसे आरव तात्यांचे संबध ठाकरे परिवारांशी आहेत, तसेच संबध आमच्या संगळ्याशी आहेत.
तेव्हा पाचोरा येथे आरव तात्यांच्या पुतळा अनावरणसाठी कार्यक्रमांसाठी येत असताना कोणी राजकीय वळण लावण्याचा प्रयत्न केला. आरव तात्यांच्या प्रेमापोटी पुतळा अनावरण कार्यक्रमाला येणार. अशावेळी आमचे आमदार, मंत्री असतील त्याच्यावर कोणी नाहक टीका करण्याचा प्रयत्न केला. तर शिंदे साहेबांच्यावर प्रेम करणारे, स्थानिक आमदार, मंत्री यांचे कार्यकर्ते अशी टीका सहन करणार नाहीत. त्यांनी कार्यक्रमापुरते बोलावे राजकीय वळण दिले गेले असल्यास तसेच चुकीचे बोलले गेल्यास ॲक्शनला रिएक्शन येणारच असा प्रतिहल्ला उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे