‘अजित पवार घोटाळेबाज, त्यांना अध्यक्षपद देणं चुकीचं’ : माजी आमदाराच मोठं वक्तव्य
सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
शरद पवार यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडल्यानंतर त्यांचा वारसा कोण चालवणार? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, अजित पवार की सुप्रिया सुळे, अशी चर्चा रंगली असतानाच माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप करत मोठं वक्तव्य केलं आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राजकीय निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची नावं अध्यक्षपदासाठी आघाडीवर आलीत. मात्र, शालिनीताई पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना पसंती देत अजित पवार घोटाळेबाज आणि गुन्ह्यामध्ये अडकलेले नेते आहेत. अशी टीका केली आहे. शरद पवार माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहेत. मी अजूनही कामकाज सांभाळते. त्यामुळे शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय खुप घाईत घेतला, असंही मत शालिनीताई पाटील यांनी व्यक्त केलं.
तसेच अजित पवार घोटाळेबाज आणि गुन्ह्यामध्ये अडकलेले नेते आहेत. त्यांना कधीही अटक होऊ शकते. त्यामुळे त्यांना अध्यक्षपद देणं चुकीचं ठरेलं, अशी टीकाही शालिनीताई पाटील यांनी केली आहे.