Hello News 2026 Ganpati Arati Book
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराजकियराज्यसातारा

अजित पवारांबाबत गाैप्यस्फोट : राष्ट्रवादीचा वजीर 40 आमदारांसह गायब होण्याच्या मार्गावर

सातारा | शरद पवार साहेब हुशार आहेत, त्यांना कळलं होत की वजीर निघून जाणार. त्यामुळे आख्या राष्ट्रवादी पक्षच नामशेष होण्याच्या मार्गावर चालला होता. साधारणः 40 आमदारांसह त्यांचा वजीर गायब होणार होता आणि थोड्या दिवसांनी गायब होणारच आहे, असा गाैप्यस्फोट शिंदे गटाचे शिवसेनेचे आ. महेश शिंदे यांनी केला आहे.

Sunil Bamane

कोरेगावचे आ.महेश शिंदे यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर तोफ डागली आहे. शरद पवार यांच्या राजीनाम्याबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले, पक्ष टिकवण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात, त्या गोष्टी कराव्या लागणारच. आता महाराष्ट्रात प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हाव वाटतयं. जो सक्षम आहे, त्यांनी मुख्यमंत्री व्हाव. परंतु एकाच घरात दोन मुख्यमंत्री कसे होणार, असा सवालही उपस्थित केला.

Sunil Bamane

महाविकास आघाडीची वज्रमुठ कधी नव्हतीच. वज्रमुठ करण्यासाठी ताकद लागते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीची वज्रमुठ कधी गायब केली आहे. महाविकास आघाडीबाबत बोलायचं तर जी जमीन आपली नाही, ती जमीनच विकली गेली आहे, हे आता कळायला लागलं असा उध्दव ठाकरेंना टोला लगावला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close