क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

तब्बल 5 कोटीची व्हेल माशाची उलटी : Ambulance मधून तस्करी

सातारा | रुग्णवाहिकेतून व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या एका निवृत्त पोलिसासह चार जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) अटक केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या उलटीची किंमत तब्बल 5 कोटी 43 लाख असल्याचे समोर आले आहे. पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील दिग्विजय टोयोटा शोरूमजवळ सायंकाळी कारवाई करण्यात आली.

सिद्धार्थ विठ्ठल लाकडे (वय- 31, रा. कासारविली, ता. जि. रत्नागिरी), अनिस इसा शेख (वय- 38, रा. शिवाजीनगर, हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), नासिर अहमद रहिमान राऊत (वय- 40, रा. भडकंबा, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) व स्वेच्छानिवृत्त पोलिस किरण गोविंद भाटकर (वय- 50, रा. भाटिये, ता. जि. रत्नागिरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

रत्नागिरीहून एका रुग्णवाहिकेतून व्हेल माशाच्या उलटीची तस्करी होणार असल्याची माहिती एलसीबीचे निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी राष्ट्रीय महामार्गावरील दिग्विजय टोयोटा शोरूमजवळ सापळा लावला. मंगळवारी सायंकाळी रुग्णवाहिका येताच पोलिसांनी हात दाखवून गाडी अडवली. रुग्णवाहिकेतील चार संशयितांना अटक करण्यात आली. त्यापैकी एकाच्या हातात काळपट पिशवी होती. त्यामध्ये पोलिसांनी पाहिले असता, पिवळसर रंगाचा ओबड धोबड आकाराचा पाच किलोंचा पदार्थ दिसून आला. वनाधिकाऱ्यांनी पाहणी केली असता, तो पदार्थ व्हेल माशाची उलटी असल्याचे निष्पन्न झाले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रती किलो 1 कोटी रुपये याची किंमत आहे. त्यामुळे या उलटीची किंमत 5 कोटी असल्याची माहिती समोर आली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker