ताज्या बातम्याधार्मिकपश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

वडगांव हवेलीत प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिरचा बाल दिंडी सोहळा

कराड | आषाढी एकादशीचे औचित्य साधून वडगाव हवेली (ता. कराड) येथील यशवंत शिक्षण संस्थेचे प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर यांच्यावतीने विद्यार्थी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या दिंडीमधील पालखी , ज्ञानेश्वरी,संत तुकाराम महाराज ग्रंथाचे पुजन संस्था संचालक जे.के.जगताप,माजी तंटामुक्ती अध्यक्ष जे.जे.जगताप, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत काटवटे यांनी केले.

Brilliant Academy

दिंडी मध्ये वेशभूषेतील विठ्ठल,रुक्मिणी,संत तुकाराम महाराज यांनी गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. तसेच वारकरी वेषातील लहान मुले, मध्यभागी पालखी, भगव्या पताका, टाळ मृदंग वाजवत ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज यांच्या जय घोषात, विठू नामाचा गजर अशा वातावरणामध्ये दिंडी सोहळा रंगला. या दिंडी सोहळ्यात विठ्ठल रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आदी संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी आकर्षण ठरले. बाल वारकरी दिंडी सोहळ्याचे शाळेच्या वतीने नियोजन मुख्याध्यापक प्राथमिक डी. पी. पवार, मुख्याध्यापिका व्ही. एच. कदम यांनी केले. या दिंडी सोहळ्याच्या यशस्वितेसाठी एन.एस.पोळ,ए. एल. पाटील, एस. एम. आवटी, एन. एस. कराळे, एल. जे. कुंभार, ए. एल. लोकरे, एम. एस. सकटे, एम. एस. पाटील, एम. डी. पाटील,अश्विनी सांळुखे आदीं शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचारी दादा पाटील, अब्दुल मुल्ला, शिवाजी चव्हाण व व्यवस्थापन कमिटीच्या सदस्यांचे योगदान लाभले.

Kota Academy Karad

शाळेतील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्ताने प्रतीकात्मक दिंडी काढली होती. या दिंडीचे ग्रामस्थांनी ठिकठिकाणी औक्षण करून स्वागत केले. या दिंडी सोहळ्यामुळे टाळ, मृदुंग व विठू नामाने परिसर भक्तीमय तसेच विठ्ठमय झाला. हाती भगव्या पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या लहान मुली यामुळे पालखी मार्ग अधिकच खुलून गेला होता. या दिंडीचे स्वागत ग्रामपंचायतीच्या प्रांगणात सरपंच राजेंद्र जगताप, यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.ग्रापंचायत प्रांगणात रिंगण सोहळा, झिम्मा फुगडी हे खेळ मुली खेळल्या.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker