Hello News 2026 Ganpati Arati Book
ताज्या बातम्याधार्मिकपश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा

बकरी ईदची सार्वजनिक सुट्टी 29 जूनला

मुंबई | राज्य शासनाने यंदाच्या वर्षात शासकीय कार्यालयांना बकरी ईद (ईद- उल-झुआ) या सणासाठी गुरुवार दि. 29 जून 2023 रोजी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना जारी केली आहे.

Kota Academy Karad

राज्य शासनाने सन 2023 मध्ये राज्य शासकीय कार्यालयांना एकूण 24 सार्वजनिक सुट्या अधिसूचित केल्या आहेत. सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये बकरी ईद (ईद-उल-झुआ) या सणाची सुट्टी बुधवार दि. 28 जून 2023 रोजी दर्शविण्यात आलेली होती. तथापि, बकरी ईद (ईद-उल-झुआ) हा सण गुरुवार दि. 29 जून 2023 रोजी येत आहे.

Brilliant Academy

यापूर्वी बुधवार दि. 28 जून 2023 रोजी जाहीर करण्यात आलेली सार्वजनिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी आता बकरी ईद (ईद-उल- झुआ) ची सार्वजनिक सुट्टी दि. 29 जून रोजी जाहीर करण्यात आली असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close