ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रप्रशासनराज्यसातारा

बनवडी ग्रामपंचायत स्वच्छतेत जिल्ह्यात पहिली : जिल्हा परिषदेकडून विशेष पुरस्कार

कराड | जिल्हा परिषद, सातारा यांचेकडून आज ग्रामपंचायत बनवडी ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय ” संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान मध्ये प्रथम क्रमांक” आणि “वसंतराव नाईक सांडपाणी व्यवस्थापन विशेष पुरस्कार प्रथम क्रमांक ” तसेच “स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये प्रथम क्रमांक” देऊन गाैरविण्यात आले. या पुरस्कारामुळे ग्रामपंचायतीला लाखो रूपये बक्षीस स्वरूपात मिळाले असून ग्रामपंचायतीचा डंका राज्यभर झाला आहे.

यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी श्री चंद्रा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे यांच्यासह ग्रामंपचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

विशेष पुरस्कार सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच मोहन जानराव, सदस्य विकास करांडे, पांडुरंग कोठावळे, सदस्या पल्लवी साळुंखे, विद्या शिवदास, स्वाती गोतपागर, पूजा चव्हाण, अलका पाटील, कमल म्हेत्रे, ग्राम विस्तार अधिकारी सदाशिव खांडके, दीपक हिनुकले, माजी जि. प. सदस्य सागर शिवदास, संदीप साळुंखे, योगेश गोतपागर यांनी स्विकारला.

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker