Hello News 2026 Ganpati Arati Book
आरोग्यताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रप्रशासनब्रेकिंगमुंबईराजकियराज्यसातारासामाजिक

कार्वेत 1400हून अधिक नागरिकांची मोफत तपासणी

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आज वाढदिवस 

कराड : कोणताही आजार अंगावर काढू नये वैद्यकीय तंत्रज्ञान प्रगत झाले असल्याने कोणत्याही आजारावार तात्काळ उपचार होण्यासाठी तपासणी आवश्यक आहे. त्यामुळे स्वतः च्या आरोग्याची काळजी स्वतः प्राथमिकतेने घेतली पाहिजे यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्वे येथे केले.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त कार्वे येथे आयोजित आरोग्य शिबिरात जवळपास चौदाशेहुन अधिक नागरिकांनी सहभाग नोंदविला. यावेळी कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, माजी पं स सदस्य नामदेवराव पाटील, इंद्रजित चव्हाण, कार्वेचे माजी सरपंच वैभव थोरात, शब्बीर मुजावर, काँग्रेसचे डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.विलास थोरात, रंगराव थोरात, विष्णू हुलवान, विठ्ठल हुलवान, माणिकतात्या थोरात, प्रल्हाद हुलवान, सुजित थोरात, भगवान सुतार, अशोकराव थोरात, साहेबराव थोरात, जिना मुलाणी, संतोष थोरात, अनिकेत घाडगे, रोहित थोरात, सलीम मुलाणी आदीसह कार्वे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

माजी खा. श्रीमती प्रेमीलाताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने तसेच विश्वराज हॉस्पिटल व एच व्ही देसाई हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने व संकल्प सामाजिक संस्थेच्या सहकार्याने कार्वे येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात प्रामुख्याने डोळे तपासणी, अस्थिविकार, दंतरोग, शुगर, कान, नाक, घसा, स्त्रीरोग तपासणी तसेच सर्वसाधारण तपासणी आदी सर्व तपासण्या मोफत करण्यात आल्या.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आज वाढदिवस 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांचा 78 वा वाढदिवस आज 17 मार्च रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होत आहे. वाढदिवसानिमित्त माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) हे वाढदिवसानिमित्त पाटण कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानी सकाळी ११ वाजले पासून शुभेच्छा स्वीकारणार असल्याची माहिती कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली आहे. पृथ्वीराज बाबांच्या वाढदिवसानिमित्त सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी पुष्पगुच्छ हार तुरे न आणता शैक्षणिक उपयोगी साहित्य आणावे असेही आवाहन करण्यात आले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close