आटकेत भोसले गटाचीच सत्ता : सर्वपक्षीय पॅनेलचा धुव्वा
कराड | आटके विकास सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूकीत भाजपाचे कराड तालुकाध्यक्ष पै. धनाजी पाटील व कृष्णा बँकेचे माजी संचालक प्रमोद पाटील समर्थक श्री. मुकुंद महाराज ग्रामविकास आघाडी पॅनेलने सर्वपक्षीय परिवर्तन पॅनेलचा 13/0 ने पराभव केला. सत्ता कायम राहिल्याने कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आता सोसायटी निवडणुकीत सत्तांतर होणार की सत्ता कायम राहणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते.
आटके विकास सोसायटीत सर्वपक्षीय पॅनेलने आटकेमध्ये परिवर्तन आटके विकास आघाडीच्या माध्यमातून विरोध दर्शवला. यामध्ये कृष्णा कारखान्याचे संचालक गुणवंतराव पाटील, कृष्णा बँकेचे संचालक प्रकाश पाटील, कृष्णा कृषी परिषदेचे संचालक गजेंद्र पाटील, भैरवनाथ सोसायटीचे चेअरमन अरविंद पाटील, कोयना सहकारी बँकेचे संचालक अजित पाटील, माजी पंचायत समिती सदस्य डॉ. राजेंद्र पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर पाटील, कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते समर्थक विजयसिंह पाटील, राजेश पाटील, कारखान्याचे माजी संचालक मानसिंगराव पाटील, जेष्ठ नेते माणिक पाटील यांचा सहभाग आहे. परंतु आटके ग्रामपंचायत निवडणुकीतील वापरलेली खेळीचा परिणाम आटके विकास सोसायटी दिसून आला नाही. परिणामी सर्वपक्षीय परिवर्तन आटके विकास पॅनेलला पराभवास सामोरे जावे लागले.
विजयी उमेदवारामध्ये सर्वसाधारण पुरुष गटात ः- अनिल काळे, प्रमोद जाधव, अनिलकुमार पाटील, तुकाराम पाटील, पवनकुमार पाटील, बाळासो पाटील, विक्रम पाटील, मानसिंग पाटील, महिला राखीव गटात ः- अर्चना पाटील, विजया पाटील. अनुसूचित जाती-जमाती गटात ः- अनिल बामणे. भटक्या विमुक्त जाती गटात ः- दादासो मदने. इतर मागासवर्गीय गटात ः- दिलीप सुतार यांचा समावेश आहे. विजयी उमेदवारांचे कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, भाजपाचे नेते डॉ. अतुल भोसले, भाजपा कराड तालुकाध्यक्ष पै. धनाजीराव पाटील, कृष्णा बँकेचे माजी संचालक प्रमोद पाटील यांनी अभिनंदन केले.