जीव केवढा, त्याचं वय काय? अन् शेंबड्या पोराने मुख्यमंत्र्यांची लायकी काढणं : प्रवीण दरेकर
सातारा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लाज आदित्य ठाकरे काढतो. त्याचा जीव केवढा, त्याचं वय काय? शेंबड्या पोराने मुख्यमंत्र्यांची लायकी काढणे महाराष्ट्रात कधीच झालं नव्हतं, असा टोला भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर म्हणाले. साताऱ्यात माध्यमांशी ते बोलत होते.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरून विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर म्हणाले, महाराष्ट्र हा प्रग्लब विचाराचा आहे असे किती येतात आणि किती जातात. या मातीत अनेकांनी पाय रोवण्याचा प्रयत्न केला आम आदमी पार्टी देखील धडपड करत आहे. इतर कोणीही येऊ अगदी BRS आले तरी काही फरक पडणार नाही. राज्य देवेंद्र फडणवीस तर देश मोंदीच्या नेतृत्वात मजबूत होत आहे.
बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाने देखील शेण खाल्ले प्रवीण दरेकर
बाळासाहेबांच्या नातवाने शेण खाल्लं अशी टीका शंभूराज देसाई यांच्यावर संजय राऊत यांनी केलीये मात्र आमच्या बाळासाहेब ठाकरेंचा नातवाने देखील शेण खातोय हे त्याच गोठ्यात असल्यामुळे त्यांना दुसऱ्याच्या शेणाचा वास येतोय. संजय राऊत यांच्या वक्तव्याला आम्ही विशेष महत्त्व देत नाही बेतावल वक्तव्य करून प्रसिद्धीत राहायचं हे त्यांचे काम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लाज आदित्य ठाकरे काढतो त्याचा जीव केवढा त्याचं वय काय? शेंबड्या पोराने मुख्यमंत्र्यांची लायकी काढणे महाराष्ट्रात कधीच झालं नव्हतं. सत्ता आणि पक्ष गेल्यामुळे ते वैफल्यग्रस्त झालेत. यामुळे अशी वक्तव्य हे लोक करत आहेत.
उध्दव ठाकरे यांची बेताल वक्तव्य टोमणे मारायची औकात
सरकार अपात्र ठरेल याबाबत संजय राऊत यांनी आतापर्यंत 7 तारखा दिल्या आहेत. त्यांनी फक्त वाटच बघावी आम्ही ही कारकीर्द पूर्ण करणार आणि पुढील पाच वर्षे देखील फडणवीस आणि शिंदे यांचे सरकार येईल. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे, की कुणाचा बाप आला तरी आम्ही मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार नाही. भावनिक वातावरण करून सहानुभूती मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत. यांना बेताल वक्तव्य करायची टोमणे मारायचे याच्या पलीकडे यांचे औकात नाही.